घटस्फोटित किंवा विधवा महिलेला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो का ? कायदा म्हणतो की…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Rights : भारतात मुलाला आणि मुलीला समान अधिकार मिळालेले आहेत. भारतीय कायद्याने संपत्तीत मुलाला आणि मुलीला समान अधिकार दिले गेले आहेत. खरंतर हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956 यानुसार मुलीला आणि मुलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार दिले गेले आहेत.

तथापि अनेकांच्या माध्यमातून जर मुलगी घटस्फोटीत असेल किंवा विधवा असेल तर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो का?  हा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरेतर कायद्याने वडीलोपार्जित संपत्तीत मुलींना देखील मुलांप्रमाणेच समान अधिकार केलेले आहेत. मात्र अनेकदा संपत्तीमध्ये मुलींना डावलले जाते. मुलींना त्यांचा अधिकार अनेकदा मिळत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत आजही मुलींना कमी लेखले जाते.

मात्र जर एखाद्या मुलीला तिच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार मिळत नसेल तर ती न्यायालयात जाऊन तिचा अधिकार प्राप्त करू शकणार आहे.

दरम्यान, आता आपण मुलगी घटस्फोटीत असेल किंवा विधवा असेल तर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो की नाही याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

काय सांगतो कायदा

हिंदू वारसा हक्क अधिनियमानुसार आणि हिंदू वारसा हक्क दुरुस्ती अधिनियम 2005 नुसार, मुलीला मुलांप्रमाणेच वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो. मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार देण्यात आला आहे.

तिला तिच्या भावाप्रमाणेच समान अधिकार देण्याची कायद्यात तरतूद असेल. विशेष म्हणजे मुलगी घटस्फोटीत असली तरीही आणि मुलगी विधवा असली तरीही तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत तिच्या भावाप्रमाणेच अधिकार मिळणार आहेत.

एवढेच नाही तर हिंदू वारसाहक्क (दुरुस्ती) अधिनियम, 2005 अनुसार, एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करताच मरण पावला, तर त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर त्याच्या मुलांइतकाच मुलींचाही हक्क असेल.

यात मुलगी विवाहित आहे अथवा नाही, याचा विचार करण्याची गरज नाही. म्हणजे मुलगी विवाहित असो,अविवाहित असो, तिचा घटस्फोट झालेला असो किंवा विधवा असो तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत भावाप्रमाणेच हिस्सा मिळतो.

Leave a Comment