Property Rights : भारतात प्रामुख्याने हिंदू सनातन धर्मात लग्न हे सात जन्मांसाठी असते असे म्हटले जाते. मात्र अलीकडे भारतीय संस्कृतीवर वेस्टर्न कल्चरचा प्रभाव पाहायला मिळत आहे. अलीकडे हिंदू सनातन धर्मात देखील मोठ्या प्रमाणात गरज घटस्फोटाच्या घटना पाहायला मिळत आहे. देशात घटस्फोटाचे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
मात्र, पती-पत्नीचा जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा संपत्तीचा विषय देखील निघतो. न्यायालयात काही प्रकरणांमध्ये पत्नीच्या माध्यमातून आपल्या पतीच्या संपत्तीवर दावा सांगितला जातो.
यामुळे आज आपण घटस्फोट झाल्यानंतर महिलेला तिच्या पतीच्या किंवा सासरच्या संपत्तीवर अधिकार मिळू शकतो का? या बाबतीत कायदा काय सांगतो याविषयी अगदी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
घटस्फोट झाल्यानंतर महिलेला तिच्या पतीच्या किंवा सासरच्या संपत्तीवर अधिकार मिळतो का
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्या जोडप्याचा घटस्फोट होतो, पत्नी जेव्हा पतीपासून कायदेशीर विभक्त होते तेव्हा तिला काही गोष्टी मिळवण्याचा अधिकार असतो. यामुळे घटस्फोट झाल्यानंतर महिलेला तिच्या पतीच्या किंवा सासरच्या संपत्तीचा हिस्सा मिळू शकतो का असा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की पत्नी जेव्हा आपल्या पतीपासून विभक्त होते तेव्हा तीला तिच्या पतीकडून पोटगी मिळवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. पण, पती-पत्नी दोघांच्याही आर्थिक स्थितीच्या आधारावर पोटगीचा निर्णय हा घेतला जात असतो.
घटस्फोटावेळी पोटगीची वन टाईम सेटलमेंटही करता येते. म्हणजे एकाच वेळी एक निश्चित रक्कम दिली जात असते. किंवा मग दर महिन्याला पोटगी दिली जाऊ शकते म्हणजे मासिक भत्ता दिला जाऊ शकतो.
घटस्फोटानंतर जर मुले आईसोबत राहत असतील तर पतीला अशा प्रकरणांमध्ये मुलाच्या संगोपनासाठी अधिकची पोटगी द्यावी लागेल. मात्र पतीच्या मालमत्ता किंवा संपत्तीवर घटस्फोट झाल्यास पत्नीचे अधिकार नाहीत.
पण, घटस्फोटीत महिलेच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार राहणार आहे. याशिवाय, जर पती-पत्नी संयुक्तपणे मालमत्तेचे मालक असतील, दोघांच्या नावावर संपत्ती असेल तर अशा प्रकरणात मालमत्ता लोकांना मिळत असते. कारण की, ते दोघे मालक असतात.