चेकच्या मागे केव्हा सही करावी लागते, सही केली नाही तर काय होत ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheque Payment : भारतात अलीकडे पैशांच्या व्यवहारांसाठी यूपीआयने पेमेंट केले जाऊ लागले आहे. यासाठी विविध एप्लीकेशन उपयोगात आणल्या जात आहेत. फोन पे, पेटीएम, गुगल पे, अमेझॉन पे अशा विविध एप्लीकेशनच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केले जात आहेत. यूपीआय मुळे फक्त एका क्लिकवर पैशांचे व्यवहार होत आहेत. परिणामी देशात कॅशलेस इकॉनोमीला चालना मिळाली आहे.

मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार आता आपल्या देशात होऊ लागले आहेत. यासाठी केंद्रातील सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र असे असले तरी काही ठिकाणी आजही चेकने पेमेंट दिले जाते. चेकने फार पूर्वीपासून पेमेंट केले जात असून अनेक ठिकाणी चेकनेच पेमेंट स्वीकारले जाते.

चेकचा वापर हा बँकेतून पैसे काढण्यासाठी देखील होतो. एकंदरीत यूपीआयचा जमाना आला असला तरी देखील चेकचे महत्व देखील काही कमी झालेले नाही. तुम्हीही कधी चेकने पेमेंट केले आहे का? मग आजची बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कारण की, आज आपण चेकच्या मागे केव्हा सही करावी लागते, चेकच्या मागे सही केली नाही तर काय होते या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुमचा चेक बेअरर चेक असेल तर त्याच्या मागे सही करणे आवश्यक आहे.

कारण म्हणजे अशा चेकमध्ये कोणाचेही नाव लिहिले जात नाही. जर समजा ज्याने हा चेक बँकेत नेला, अन तो चेक त्याला कुठेतरी सापडला असेल तर अशावेळी बँक अडचणीत येऊ शकते. अशा परिस्थितीत, स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी, बँक चेकच्या मागील बाजूस चेक आणणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी घेतात.

याद्वारे ते हे सुनिश्चित करतात की धनादेशातून काढलेले पैसे चेक आणलेल्या व्यक्तीलाचं देण्यात आले आहेत आणि जर तो चेक अज्ञात व्यक्तीने कॅश केला असेल तर बँकेचा त्यात कोणताही सहभाग नाही.

बीयरर चेकद्वारे कोणालाही पैसे काढता येतात? यामुळे बँकेच्या माध्यमातून अशाच एक वर मागे सही करायला सांगितले जाते. बीयरर चेकमध्ये जर मोठी अमाऊंट असेल तर बँकेच्या माध्यमातून ऍड्रेस प्रूफ देखील मागवला जातो.

जेणेकरून भविष्यात काही गडबड झाल्यास बँकेकडे पुरावा राहील, तसेच दोषी विरोधात कारवाई करता येईल. ऑर्डर चेक असल्यास चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करण्याची गरज राहत नाही.

ऑर्डर चेकमध्ये ज्या व्यक्तीचे नाव लिहिलेले असेल त्यालाच पैसे दिले जातात. हा ऑर्डर चेक आहे, बेअरर चेक नाही, असे या चेकवर स्पष्ट लिहिलेले असते. हा धनादेश कॅश करताना त्या व्यक्तीने बँकेत हजर असणे आवश्यक आहे.

याच कारणामुळे ऑर्डर चेकवर स्वाक्षरी करणे आवश्यक नसते. मात्र, ऑर्डर चेकवरही पैसे देण्यापूर्वी बँक कर्मचारी स्वत: सखोल चौकशी करून समाधानी झाल्यानंतरच पैसे देतात.

Leave a Comment