पुणे अन अहमदनगरकरांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, ‘त्या’ 19 Railway Station वर थांबणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ahmednagar Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहे. लोकसभा निवडणुका आणि लग्नसराईचा देखील हंगाम सुरू आहे. सणासुदीचाही हंगाम सुरू असून येत्या दहा तारखेला अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात मोठे आनंदाचे वातावरण असून उन्हाळी सुट्ट्या, निवडणुका, लग्नसराई आणि सणासुदीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक मूळ गावी परतत आहेत.

शिवाय पर्यटनस्थळावर देखील नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. हेच कारण आहे की सध्या रेल्वे स्थानकावर अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रेल्वे मार्गावरील गाड्या हाऊसफुल धावत आहेत. यामुळे मात्र प्रवाशांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतोय.

दरम्यान याच अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे रेल्वे स्थानकावरून विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार पुणे ते मुझफ्फरपूर यादरम्यान या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे. या गाडीच्या पुणे ते मुजफ्फरपुर अशा नऊ आणि मुजफ्फरपुर ते पुणे अशा 9 अशा एकूण 18 फेऱ्या होणार आहेत.

वेळापत्रक कसे राहणार ? 

ट्रेन क्रमांक 05290 पुणे-मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी स्पेशल पुण्याहून 6.5.2024 ते 1.7.2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही ट्रेन दर सोमवारी सकाळी 6:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 15:15 वाजता मुझफ्फरपूरला पोहोचणार आहे.

तसेच गाडी क्रमांक ०५२८९ मुझफ्फरपूर-पुणे सुपरफास्ट एसी स्पेशल 4.5.2024 ते 29.6.2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी मुझफ्फरपूर येथून दर शनिवारी रोजी रात्री 21:15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 5:35 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, आणि हाजीपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे.

Leave a Comment