महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल, मंगळवारपासून ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता ! पंजाबरावांचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली असून यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढू लागली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे.

सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बुधवारी देखील राज्यात पाऊस बरसणार असून बुधवारी मध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आय एम डी च्या म्हणण्यानुसार, सोमवारी आणि मंगळवारी मराठवाडा विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड या 3 जिल्ह्यात आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया या 4 जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तयार होत आहे.

तसेच आठ मे ला राज्यातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, सोलापूर आणि धाराशिव या 7 जिल्हांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येत आहे.

काही भागांमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र असे असतानाही काही ठिकाणी वादळी पाऊस देखील बरसणार अशी परिस्थिती तयार होत आहे.

यामुळे उकाड्याने हैरान जनतेला थोडासा दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाप्रमाणेचं पंजाब रावांनी देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

काय म्हणताय पंजाबराव डख

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मंगळवारपासून पावसाला सुरुवात होणार आहे. सोमवारपर्यंत राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. त्यानंतर मात्र राज्यातील हवामानात अमुलाग्र बदल होईल आणि महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये वादळी पाऊस होईल अशी शक्यता आहे.

सात मे पासून पावसाला सुरूवात होणार असून त्यापुढील पाच दिवस म्हणजेच 11 मे पर्यंत राज्यात पावसासाठी पोषक परिस्थितीत राहणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यामुळे शेतकरी बांधवांनी सहा मे पर्यंत काढणी योग्य पिकांची काढणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन पंजाबराव यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हळद आणि कांदा पिकाची काढणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असे पंजाबरावांनी म्हटले आहे.

एकंदरीत येत्या काही दिवसात राज्यात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. तथापि हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रासहित राज्यातील अनेक भागांमध्ये उत्पादित होणाऱ्या उस पिकासाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. या पावसामुळे ऊस पिकाच्या वाढीला मदत होईल अस सांगितलं जात आहे. 

Leave a Comment