Property Rights : आपण नेहमीच संपत्ती विषयक बाबींची माहिती जाणून घेत असतो. संपत्ती विषयक कायद्यातल्या तरतुदीबाबत आपण नेहमीच माहिती जाणून घेत असतो. खरे तर संपत्तीच्या कारणावरून कुटुंबांमध्ये मोठ-मोठे वाद वाद पाहायला मिळतात. भावंडांमध्ये, पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्तीवरून वाद विवाद होतात.
अनेकदा वाद-विवादाच्या घटना भांडणात परावर्तित होतात. दरम्यान, काही लोकांच्या माध्यमातून नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासऱ्याच्या घरावर सुनेचा अधिकार असतो का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासंदर्भात कायदे तज्ञांनी नेमके काय म्हटले आहे याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.
काय म्हणतात कायदेतज्ञ ?
सासऱ्याने स्वतःच्या कमाईने म्हणजेच स्वकष्टार्जित घर विकत घेतले असेल तर त्या घरामध्ये सुनेला राहायचा अधिकार असतो का ? असा प्रश्न काही लोकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, घर हे संपूर्णपणे सासऱ्यांनी स्वतःच्या स्वकष्टार्जित कमाईतून म्हणजे स्वतःच्या पैशातून घेतलेले असेल ते वडिलोपार्जित नसेल तर सुनेला सासऱ्याच्या घरामध्ये हक्क मागण्याचा अधिकार राहत नाही. म्हणजेच अशा घरावर सुनेचा अधिकार नसतो.
ही सासर्याची स्वतःच्या कष्टाने कमावलेली प्रॉपर्टी आहे. ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. त्यामुळे अशा संपत्तीवर सुनेला कोणताच अधिकार नसतो. कायदे तज्ञ सांगतात की, सासऱ्यांनी विकत घेतलेले घर हे सुनेसाठी वडिलोपार्जित मालमत्ता होऊ शकत नाही.
जर समजा अशाच एका प्रकरणांमध्ये जर सासऱ्याने स्वतःच्या कष्टाने बांधलेल्या घरात सून जबरदस्ती घुसली तर तीला घरातून बाहेर काढले जाऊ शकते. यासाठी न्यायालयात दावा दाखल केला जाऊ शकतो.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर देखील सासऱ्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेत सून हक्क मागू शकत नाही, ही देखील गोष्ट तज्ञांनी अधोरेखित केली आहे. अर्थातच सासऱ्याने जर स्व कष्टाने संपत्ती कमावलेली असेल, संपत्ती वडीलोपार्जित नसेल तर नवरा हयात नसला तरी देखील सुनेला अशा संपत्तीत अधिकार राहत नाही.
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीला अधिकार असतो का ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलोपोर्जित संपत्तीमध्ये मुलीला देखील अधिकार असतो. भारतीय कायद्याने मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच समान अधिकार दिलेले आहेत.
अर्थातच जेवढा मुलांचा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार असतो तेवढाच अधिकार मुलींचा देखील आहे. विशेष बाब अशी की, मुलगी विवाहित असो वा अविवाहित असो, घटस्फोटीत असो किंवा विधवा असो तरी देखील मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान अधिकार मिळणार आहे.