Property Rights : मुलीला आणि मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत संपूर्ण अधिकार मिळतो. मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे समान अधिकार देण्यात आले आहेत. कायद्याने मुलींना संपत्तीत समान अधिकार दिले आहेत.
विशेष बाब म्हणजे मुलीचे लग्न झाले तर मुलीला म्हणजेच विवाहित महिलेला तिच्या वडिलांच्या संपत्तीत आणि पती किंवा सासऱ्याकडून वारशाने मिळालेल्या संपत्तीवर देखील तिचा अधिकार राहतो.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून जावयाला सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळतो का ? कायद्यात याविषयी काही तरतूद करून देण्यात आली आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान याच संदर्भात पटियाला हाऊस कोर्टातील वकिलांनी मोठी माहिती दिली आहे.
जावयाला सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळतो का ? सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला केव्हा अधिकार मिळतो अशा अनेक बाबींची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
जावयाला सासऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळतो का?
पटियाला हाऊस कोर्टाचे वकील महमूद आलम यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कायद्यानुसार जावयाला सासऱ्याच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही.
म्हणजेच जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीत अधिकार नसतो. पण, एका विशेष परिस्थितीमध्ये जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार बनू शकतो.
मात्र जर मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयाने मुलीला कोणतीही जमीन किंवा मालमत्ता भेट म्हणून दिली असेल आणि त्या मालमत्तेची कागदपत्रे मुलीच्या नावावर असतील.
पण, काही कारणाने तिचा मृत्यू झाला तर त्या मालमत्तेवर जावयाचा अधिकार असतो. मात्र, अशा संपत्तीवर जावयाला तेव्हाच अधिकार सांगता येतो जेव्हा त्याला अपत्य असेल.
म्हणजे सासू-सासऱ्याने बायकोच्या नावे केलेल्या संपत्तीवर बायको मेल्यानंतर तिच्या पतीला अर्थातच जावयाला अधिकार मिळू शकतो मात्र अट एवढीच आहे की त्या दोघांनाही मुलं असावीत.
जर समजा त्या दोघांना म्हणजेच अपत्य नसेल तर अशा परिस्थितीत जावयाचा त्याच्या बायकोच्या नावे असलेल्या सासू-सासर्याच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही; न्यायालयात दावा दाखल करूनही तो काहीही साध्य करू शकत नाही.