Property Rule : कौटुंबिक संपत्तीबाबत अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद पाहायला मिळतात. वडीलोपार्जित संपत्तीच्या हिस्सावरून भावंडांमध्ये कायमच वादविवाद होतात. अनेकदा हे वादविवाद आपसी संमतीने निकाली निघत नाहीत. मग असे प्रकरण न्यायालयात जाते. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होते.
सुनावणीअंती सदर प्रकरणावर न्यायालयात कायद्याच्या बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय दिला जातो. कायद्याच्या अधीन राहून संपत्तीबाबत निकाल दिला जातो. दरम्यान संपत्तीबाबत नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न असतात. अनेकांकडून कौटुंबिक संपत्ती मध्ये बहिणीला भावाप्रमाणे समान हिस्सा मिळतो का? हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जात होता.
अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे सविस्तर उत्तर थोडक्यात जाणून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत. बहिणीला कुटुंबाच्या संपत्तीत भावाप्रमाणे समान हिस्सा मिळतो का, यासाठी कायद्यात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर, गेल्या काही दिवसांपासून काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून वडिलोपार्जित शेत जमिनीत बहिणीला देखील भावाप्रमाणे समान अधिकार प्राप्त होतो का असे काही प्रश्न विचारले जात होते. यामुळे आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
बहिणीला भावाप्रमाणे कौटुंबिक संपत्तीत हिस्सा मिळतो का?
हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये याबाबत स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार बहिणीलाही कौटुंबिक संपत्तीमध्ये भावाप्रमाणेच समान अधिकार मिळतो. म्हणजेच वडीलोपार्जित संपत्तीमध्ये बहिणीलाही भावाप्रमाणेच समान हिस्सा मिळू शकतो.
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 6 मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ जर बहिणीला कौटुंबिक संपत्ती मध्ये भावाप्रमाणे समान हिस्सा मिळत नसेल तर ती कौटुंबिक संपत्ती मध्ये आपला हक्क मागण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ शकते.
तसेच न्यायालय देखील अशा प्रकरणात बहिणीला समान हक्क मिळवून देण्यासाठी आदेश निर्गमित करते. मात्र, जर वडिलांनी स्वतःच्या कष्टाने संपत्ती कमावलेली असेल म्हणजेच स्वकष्टार्जित संपत्ती असेल म्हणजे संपत्ती वडीलोपार्जित नसेल तर अशा संपत्तीत भावालाही अधिकार नसतो आणि बहिणीलाही अधिकार नसतो.