Property Rule : आपल्या राज्यात वडीलोपार्जित संपत्तीवरून, शेतजमिनीवरून भावंडांमध्ये तसेच भावकीमध्ये मोठे वाद विवाद पाहायला मिळतात. अनेकदा संपत्तीचे हे वादविवाद भांडणाचे रूप घेतात आणि भांडण अनेकदा खून पाडण्यापर्यंत मजल मारते.मात्र जर कायद्याची व्यवस्थित समज असेल तर भांडण न करताही लोकांना आपला हक्क कायदेशीर रित्या प्राप्त करता येतो.
पण लोकांना संपत्ती विषयक कायद्याची व्यवस्थित माहिती नसल्याने संपत्तीवरून नेहमीच भावकीत संपत्ती वरून मोठे वादविवाद होत असतात. अशी प्रकरणे कित्येकदा समजूतदारीने मिटत नाहीत. यामुळे आज आपण अशाच एका कायदेविषयक बाबीविषयी जाणून घेणार आहोत.
आज आपण जर चुलता वडीलोपार्जित संपत्तीत, शेतजमीनीत हिस्सा देत नसेल तर काय केले पाहिजे ? अशावेळी पुतण्या संपत्तीवर दावा ठोकू शकतो का? यासाठी कुठे दावा दाखल करावा लागू शकतो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरतर गेल्या काही दिवसांपासून चुलता वाटणी देत नाहीये काय केले पाहिजे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. त्यामुळे आज आपण या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चुलता वाटणी देत नसेल तर काय कराल?
मित्रांनो जर चुलता वडीलोपार्जित संपत्तीत, जमिनीत वाटणी देत नसेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयात वाटणीचा दावा दाखल करू शकता. तुमची वडीलोपार्जित जमीन तसेच एकत्रित कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी केलेली जमीन, घर, फ्लॅट याचा समावेश दाव्यात करावा लागणार आहे.
तसेच कायदेशीर वारसांना म्हणजेच सहहिस्सेदारांना दाव्यात पार्टी करणे गरजेचे आहे. ज्या जमिनीवर किंवा घरावर तुम्हाला दावा सादर करायचा आहे त्या जमिनीचे किंवा घराचे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. ज्या घरासाठी किंवा जमिनीवर तुम्हाला दावा दाखल करायचा आहे त्याचा सातबारा उतारा, 8अ चा उतारा, फेरफार दाखला घेऊन तुम्ही वकिलाच्या मार्फत दावा दाखल करू शकता.