शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती आणि त्यांच्या विशेषता, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming : सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.

हे एक प्रमुख तेलबिया पीक असल्याने सोयाबीनला नियमित चांगला भाव मिळतो.शिवाय या पिकातून शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे सोयाबीनला पिवळं सोन म्हणून ओळखले जाते.

मात्र असे असले तरी सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर या पिकाच्या चांगल्या दर्जेदार आणि सुधारित जातीची लागवड करणे अति आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या प्रमुख आणि उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सोयाबीनच्या प्रमुख जाती खालीलप्रमाणे

फुले संगम म्हणजेच केडिएस 726 : महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या विविध सुधारित जातींमध्ये या जातीचा देखील समावेश होतो. या वाणाची लागवड राज्यातील विदर्भ, मराठवाडा या विभागात मोठ्या प्रमाणात केली जाते. याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील काही भागात या वाणाची शेती केली जात असल्याचे सांगितले जाते. खर तर सोयाबीनचे हे सुधारित वाण आहे. या जातीपासून उत्पादित होणाऱ्या सोयाबीनचे दाणे आकर्षक व पिवळसर रंगाचे दिसतात. पेरणी केल्यानंतर साधारणता 110 ते 115 दिवसात या जातीचे पीक परीपक्व होते. फुले संगम या वाणापासून हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

एम. ए. यू. एस.-71 (समृद्धी) : हा एक अल्प कालावधीत परिपक्व होणारा वाण आहे. ज्यावेळी पेरणीला उशीर होतो त्यावेळी या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यावर्षीही समृद्धी या सोयाबीनच्या वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे. हा वाण इतर सुधारित जातींच्या तुलनेत लवकर परिपक्व होत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. सोयाबीनचा हा सुधारित वाण 95 ते 100 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. या जातीपासून साधारणता 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते.

एम. ए. यू. एस – 612 : हा देखील एक कमी कालावधीत तयार होणारा वाण आहे. पेरणी केल्यानंतर सरासरी 94 ते 98 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. या वाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हवामान बदलाचा या वाणावर फारसा विपरीत परिणाम होत नाही. या जातीचे झाड उंच वाढते. या जातीपासून हेक्टरी 30 ते 32 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

पीकेव्ही आंबा ( पीकेव्ही ए. एम. एस.10039) : हा महाराष्ट्रात विशेषता मराठवाड्यात उत्पादित केला जाणारा एक प्रमुख वाण आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा वाण फक्त 95 ते 96 दिवसात काढण्यासाठी तयार होतो. ही जात मध्यम जमिनीत लागवडीसाठी उपयुक्त ठरते. हे एक उच्च उत्पादन देणारे वाण आहे.

एम. ए. यु. एस. 612 : राज्यात लागवडीसाठी उपयुक्त असणारा हा वाण मात्र 94 ते 98 दिवसात परिपक्व होतो. अर्थातच या जातीपासून मात्र तीन महिन्यांच्या काळात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. हेक्टरी सरासरी 30 ते 32 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा केला जातो. निश्चितच राज्यातील हवामान या जातीला मानवत असल्याने या वाणाची लागवड देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment