Pune Ahmednagar Railway : उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुण्यावरून सुटणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वे गाड्या हाउसफुल धावत आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. अशातच आता पुणे आणि अहमदनगरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुण्यावरून एक उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी अहमदनगर मार्गे चालवली जाणार असल्याने या गाडीचा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते मुजफ्फरपुर दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे.
पुणे-मुजफ्फरपुर उन्हाळी विषयाची गाडीच्या दहा फेऱ्या आणि मुजफ्फरपुर-पुणे उन्हाळी विशेष गाडीच्या दहा फेऱ्या अशा एकूण वीस फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक
पुणे-मुझफ्फरपूर (गाडी क्रमांक 05290) उन्हाळी विशेष गाडी 29 एप्रिल ते एक जुलै 2024 दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून प्रत्येक सोमवारी सकाळी साडेसहा वाजता सोडली जाणार आहे.
तसेच ही गाडी मुजफ्फरपुर रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वातीन वाजता पोहोचणार आहे. या कालावधीत या गाडीच्या दहा फेऱ्या होणार आहेत. यामुळे पुणे ते मुजफ्फरपुर असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय मुजफ्फरपुर-पुणे (गाडी क्रमांक 05289) उन्हाळी विशेष गाडी 27 एप्रिल ते 29 जून 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी मुजफ्फरपुर रेल्वे स्थानकावरून प्रत्येक शनिवारी रात्री सव्वानऊ वाजता सुटणार आहे आणि पुणे रेल्वे स्थानकावर तिसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेनला हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. यामुळे पुणे अहमदनगर समवेत इत्यादी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.