पुणेकरांसाठी खुशखबर ! पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल ‘या’ महिन्यात होणार सुरू, काय फायदा होणार 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Airport New Terminal : गेल्या काही दशकांमध्ये पुणे शहराचा विस्तार वेगाने झाला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे शहर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शिवाय अलीकडे शहरात वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.

यामुळे अलीकडे पुणे शहर आयटी हब म्हणून देखील वेगाने विकसित होत आहे. तसेच शहराला फार पूर्वीपासूनच शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यामुळे शहराचा विकास आणखी जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुण्यातील पुरंदर मध्ये नवीन विमानतळ प्रस्थापित करण्यात आले आहे.

या नवीन विमानतळाला मात्र पुरंदर मधील अनेक शेतकऱ्यांनी विरोध दाखवला आहे. परंतु शासन या ठिकाणी नवीन विमानतळ बांधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता पुणे विमानतळाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पुणे विमानतळाच्या टर्मिनलचे सुरू असलेले काम आता लवकरच पूर्ण होणार आहे.

यामुळे लवकरच हे टर्मिनल सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन टर्मिनलचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे या नवीन टर्मिनलची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. या टर्मिनल संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून अर्थातच पीएमओ कडून देखील वेळोवेळी आढावा घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच या टर्मिनलबाबत सर्व विमान कंपन्यांसोबत शासनाची चर्चा झाली आहे. तसेच विमान कंपन्यांना आपले ऑफिस नवीन टर्मिनल मध्ये शिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता हे टर्मिनल ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 60 हजार स्क्वेअर फूटवर उभारण्यात आलेल्या हे नवीन टर्मिनल सुरु करण्यासाठी 525 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या नवीन टर्मिनल वर पाच एरोब्रिज विकसित करण्यात आले आहेत. तसेच टेकऑफ आणि लॅण्डींगसंदर्भात देखील अनेक सुविधा नव्याने विकसित केल्या गेल्या आहेत. या नवीन टर्मिनल वरून रोज 120 विमाने उड्डाण घेणार आहेत.

सध्याच्या टर्मिनल वरून फक्त 90 विमाने उड्डाण घेत आहेत. शिवाय नवीन टर्मिनल सुरू झाले तरी देखील जुने टर्मिनल सुरूच राहणार आहे. त्यामुळे साहजिकच विमानतळावरील गर्दी दुभाजली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. शिवाय या नवीन टर्मिनल मुळे पुण्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांची संख्या देखील वाढणार आहे.

Leave a Comment