पुण्यात जोरदार पावसाची हजेरी; जिल्ह्यातील कोणत्या धरणांमध्ये किती जलसाठा? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Dam : सप्टेंबर महिन्यात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी लागली. वास्तविक, ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती होती. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळाला असून आगामी रब्बी हंगामासाठी सुद्धा या पावसाचा फायदा होणार आहे.

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. पण पावसाचा खरा जोर वाढला तो गणेशोत्सवाच्या काळात. गणेशोत्सवाच्या काळात अर्थातच 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला.

या पावसामुळे राज्यातील बहुतांशी धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. पुणे शहरात आणि जिल्ह्यातही या महिन्यात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक धरणांमध्ये पाण्याचा साठा देखील वाढला आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये वरूणराजा मनसोक्त बरसला असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक धरणांमध्ये पाण्याचा मुबलक जलसाठा तयार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुणे शहरातील पाण्याचे संकट आता दूर झाले असल्याचे मत जाणकार लोकांकडून व्यक्त केले जात आहे.

कोणते धरण भरले फुल ?

खरंतर पुणे शहराला पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या धरणांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो. दरम्यान या तीन धरणांपैकी दोन धरणे फुल झाली आहेत तर एक धरण आगामी काही दिवसात फुल होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पानसेत, टेमघर आणि वरसगाव ही धरण फुल झाली आहेत आणि खडकवासला हे धरणही जर परतीचा पाऊस चांगला समाधानकारक बरसला तर फुल होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण सध्या स्थितीला 96% पर्यंत भरले आहे.

याचा परिणाम म्हणून आता खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरण फुल होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणे शहरासाठी पुढील एका वर्षासाठी पाण्याची सोय झाली असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांपैकी खडकवासला धरण वगळता सर्व धरणे 100% क्षमतेने फुल भरली आहेत. धरण क्षत्रात गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण येत्या काही दिवसांमध्ये हाउसफुल होईल अशी शक्यता आहे. निश्चितच पुणेकरांसाठी ही एक मोठी गुड न्यूज राहणार आहे यात शंकाच नाही.

खरंतर पुण्यासमवेतच संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात खूपच कमी पाऊस झाला होता. जून महिन्यात देखील राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठे पाणी संकट उभे झाले होते.

पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सप्टेंबर मध्ये पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पुणे शहरातील पाण्याची चिंता एका वर्षासाठी मिटली असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment