Pune Local News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विशेषता पुणे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की उद्या अर्थातच 28 जानेवारी 2024 ला पुणे लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे पुणे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उद्या काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान काही महत्त्वाच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतलेला आहे.
त्यामुळे जर तुम्हाला उद्या लोकलने प्रवास करायचा असेल तर सर्वप्रथम कोणत्या लोकल गाड्या मध्य रेल्वेने रद्द केल्या आहेत याची माहिती जाणून घ्यावी लागणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मध्य रेल्वेने उद्यासाठी कोणत्या लोकल गाड्या रद्द केल्या आहेत.
या लोकल गाड्या राहणार रद्द
28 जानेवारीला पुणे-लोणावळा सकाळी नऊ वाजून 57 मिनिटांनी सुटणारी लोकल
उद्या पुणे-लोणावळा अकरा वाजून 17 मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द केली जाणार आहे.
उद्या पुणे ते लोणावळा दरम्यान दुपारी तीन वाजता सुटणारी लोकल रद्द केली जाणार आहे.
शिवाजीनगर ते तळेगाव दरम्यान दुपारी तीन वाजून 47 मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द केली जाणार आहे.
पुणे ते लोणावळा दरम्यान दुपारी चार वाजून 25 मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द राहणार आहे.
शिवाजीनगर ते लोणावळा सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द राहणार आहे.
लोणावळा ते शिवाजीनगर सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल उद्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
लोणावळा ते पुणे दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
तळेगाव ते पुणे सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल उद्या रद्द राहणार असा निर्णय घेण्यात आला आहे.
लोणावळा ते शिवाजीनगर सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोणावळा ते शिवाजीनगर यादरम्यान सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी सुटणारी लोकल उद्या रद्द केली जाणार आहे.
लोणावळा ते पुणे या दरम्यान सायंकाळी सात वाजता सुटणारी लोक रद्द करण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतलेला आहे.