सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! लग्न झालेल्या बहिणीच्या संपत्तीवर भावाचा किती अधिकार असतो ? मा. न्यायालयाने स्पष्टचं सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Supreme Court Decision : मुलाचा आणि मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार असतो. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतरही मुलाचा आणि मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवरील अधिकारात कोणताच बदल येत नाही.

म्हणजेच लग्न झाल्यानंतरही मुलगा किंवा मुलगी आपल्या वडिलांच्या संपत्ती वर दावा करू शकणार आहे. पण, अनेकांच्या माध्यमातून लग्न झालेल्या बहिणीच्या संपत्तीवर तिच्या भावाचा पण काही अधिकार असतो का असा सवाल उपस्थित केला जात होता.

दरम्यान याच प्रश्नाचे उत्तर माननीय सुप्रीम कोर्टाच्या एका निकालातून समोर आले आहे. सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेत माननीय कोर्टाने निकाल देताना लग्न झालेल्या बहिणीच्या संपत्तीवर भावाचा किती अधिकार असतो हे सांगितलं आहे.

भावाला बहिणीच्या संपत्तीवर अधिकार असतो का, तर याचे उत्तर आहे नाही. एका प्रकरणात सुप्रीम कोर्ट म्हणत की, बहिणीला पतीकडून मिळालेल्या संपत्तीवर भाऊ कोणत्याही परिस्थितीत हक्क सांगू शकत नाही.

कारण की भाऊ बहिणीच्या मालमत्तेचा वारस किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य मानला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायद्यातील तरतुदीचाही उल्लेख केला आहे.

ही तरतूद कायदेशीर इच्छापत्र न केलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या वारसाशी संबंधित आहे. परंतु ही तरतूद अशा प्रकरणांना लागू होते ज्यात महिलेचा मृत्यू ही तरतूद लागू झाल्यानंतर झालेला आहे.

या तरतुदीत असे म्हटले गेले आहे की, महिलेला तिच्या पतीकडून किंवा सासऱ्याकडून किंवा सासरच्या व्यक्तींकडून मिळालेली संपत्ती केवळ तिच्या सासरकडील वारसांना हस्तांतरित केली जाईल.

जर बहिणीला मूलबाळ नसेल तर अशा प्रकरणांमध्ये बहिणीची संपत्ती ही तिच्या पतीच्या वारसांना मिळू शकणार आहे.

मात्र जर बहिणीच्या नावे असलेली स्व अर्जित संपत्ती तीने इच्छा पत्र बनवलेले असेल आणि यात ज्या व्यक्तीला संपत्ती देण्याचा उल्लेख असेल त्याला ती संपत्ती मिळू शकणार आहे.

Leave a Comment