Pune Local News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे विभागाने पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे.
रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता लोणावळा लोकल दुपारी देखील धावणार आहे. सध्या पुण्यात पुणे ते लोणावळा या मार्गावर लोकल सुरु आहे.
कोरोनापूर्वी या मार्गावर दुपारी देखील लोकल सेवा चालवली जात होती. मात्र कोरोना नंतर या मार्गावरील दुपारची लोकल सेवा बंद झालेली आहे.
यामुळे दुपारी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. परिणामी प्रवाशांच्या माध्यमातून या मार्गावर दुपारी देखील लोकल सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाने दुपारच्या वेळी लोकल फेरी सुरू करण्यास मंजुरी दिलेली आहे. प्रत्यक्षात येत्या काही दिवसात या मार्गावर दुपारी देखील लोकल धावू शकणार आहे.
खरे तर गेल्या वर्षी झालेल्या रेल्वेच्या एका महत्त्वाच्या आढावा बैठकीत खासदार वंदना चव्हाण यांनी शिवाजीनगर ते लोणावळा आणि लोणावळा ते शिवाजीनगर यादरम्यान दुपारी प्रत्येकी एक लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती.
दरम्यान या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. आता याच प्रस्तावाला रेल्वे मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता येत्या दोन आठवड्याच्या काळात या मार्गावर दुपारच्या वेळी देखील प्रत्यक्षात लोकल सेवा सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान चालवल्या जाणाऱ्या दुपारच्या लोकल सेवेचे वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार दुपारचे वेळापत्रक ?
हाती आलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यानची दुपारची लोकल बारा वाजून पाच मिनिटांनी शिवाजीनगर येथून सुटणार आहे आणि एक वाजून वीस मिनिटांनी लोणावळा येथे पोहोचणार आहे.
तसेच लोणावळा ते शिवाजीनगर दरम्यानची दुपारची लोकल लोणावळा येथून दुपारी साडेअकरा वाजता सुटणार आहे आणि शिवाजीनगर येथे पाऊण वाजता म्हणजेच 12 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.