मुंबई ते नागपूर प्रवास होणार सुसाट, ‘या’ महत्त्वाकांक्षी मार्गाचा 25 किलोमीटरचा टप्पा लवकरच होणार सुरू, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai To Nagpur Expressway : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

नागपूर ते मुंबई दरम्यान तयार होणारा हा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. हा मार्ग डिसेंबर 2022 मध्ये अंशतः सुरू करण्यात आला आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू करण्यात आला.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचा शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटरचा भाग सुरू करण्यात आला आहे.

म्हणजेच आत्तापर्यंत 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा भाग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाला आहे.

विशेष बाब अशी की पुढील महिन्यात अर्थातच फेब्रुवारी 2024 मध्ये समृद्धी महामार्गाचा आणखी 25 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी ते भरविर हा टप्पा सुरू झाल्यानंतर आता भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांकरिता वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

15 फेब्रुवारी 2024 ला या 25 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे लोकार्पण होऊ शकते अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. अर्थातच पुढील महिन्यात 701 km पैकी 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. दरम्यान, संपूर्ण समृद्धी महामार्ग अर्थातच नागपूर ते मुंबई असा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या दोन्ही शहरातला प्रवास सात ते आठ तासात पूर्ण होऊ शकणार आहे.

दरम्यान हा 25 किलोमीटरचा मार्ग सुरू झाल्यानंतर उर्वरित समृद्धी महामार्ग देखील लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. या चालू वर्षातच समृद्धी महामार्गाचा बाकी राहिलेला भाग सुरू होणार आहे.

यामुळे या नव्या वर्षात मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या वाहतुकीच्या वेळेत आणि इंधनाच्या खर्चात यामुळे मोठी बचत होऊ शकणार आहे.

Leave a Comment