Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणेकरांना लवकरच दोन विस्तारित मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला विस्तारित मेट्रो मार्ग सुरु होणार आहेत. वास्तविक, पुणे शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केली होती.
विशेष म्हणजे पीएम मोदी यांनी गेल्या वर्षी 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक या दरम्यानच्या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला आहे. सध्या हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी सुरु झाले आहेत. दरम्यान आता या मेट्रो मार्गांचे विस्तारित मेट्रो मार्ग सुरु केले जाणार आहेत.
1 ऑगस्टला फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या मार्गावर मेट्रो सुरु होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गांला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे निश्चितच पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
यामुळे पुणे ते पिंपरी चिंचवड दरम्यानच्या प्रवासाला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे मेट्रोच्या प्रवाशांसाठी खास सवलतही देण्यात येणार आहेत. मेट्रोच्या तिकीट दरातही सवलत दिली जाणार आहे. यात विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील तिकीट दरात सवलत मिळणार आहे.
कोणत्या लोकांना मिळणार सवलत
हाती आलेल्या माहितीनुसार पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकीटरात 30 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सवलत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी सामान्य नागरिकांना देखील मेट्रोमध्ये प्रवासासाठी तिकीट दरात 30% पर्यंतची सवलत मिळणार आहे.
याशिवाय लवकरच पुणे मेट्रो कडून कार्ड दिले जाणार आहे. यानुसार तिकीट दरात दहा टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे. सकाळी सात ते दहा दरम्यान मेट्रोची सेवा सुरू राहणार असून दर दहा ते पंधरा मिनिटांनी मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहेत. मेट्रोमधील तिकिटांचे दर हे 10 ते 30 रुपयांपर्यंत राहणार आहेत.