पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वेळापत्रकात झाला मोठा बदल, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे. कारण की, पुणे मेट्रो प्रशासनाने उद्या मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे जर तुम्हीही उद्या पुणे मेट्रोने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला मेट्रोचे हे बदललेले वेळापत्रक लक्षात घ्यावे लागणार आहे. मेट्रो प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, उद्या धुळवडीच्या निमित्ताने मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

खरेतर उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर धुळवडीनिमित्ताने चांगलीच धूम पाहायला मिळणार आहे. पुणेसहित संपूर्ण राज्यभर धुळवड साजरा होणार आहे. आज होळीचा सण साजरा होणार आहे आणि उद्या धुलीवंदन अर्थातच धुळवड सेलिब्रेट होणार आहे.

परिणामी, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच, मात्र पुणे मेट्रो प्रशासनाने उद्या अर्थातच 25 मार्च 2024 ला मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना थोडा काळ मनस्ताप सहन करावा लागू शकतो. दरम्यान, आता आपण मेट्रो प्रशासनाने मेट्रोच्या वेळापत्रकात नेमका काय बदल केला आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मेट्रोच्या वेळापत्रकात झालेला बदल

पुणे मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 25 मार्चला धुलीवंदनाच्या निमित्ताने दुपारी दोन वाजेपर्यंत मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. म्हणजेच सकाळी सहा ते दुपारी दोन या कालावधीत उद्या पुणे मेट्रोची सेवा सुरू राहणार नाही.

मात्र दुपारी दोन वाजे नंतर ही सेवा पुन्हा एकदा पूर्ववत होणार आहे. दोन वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो सेवा आधीच्या प्रमाणेच सुरू राहणार आहे. तथापि जे नागरिक सकाळी मेट्रोने प्रवास करत असतील त्यांना निश्चितच या बदललेल्या वेळापत्रकाचा फटका बसणार आहे.

उद्या आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना या वेळापत्रकाचा फटका बसू शकतो. खरंतर, जेव्हापासून शहरात मेट्रोची सेवा सुरू झाली आहे, तेव्हापासून या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज 60 ते 65 हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment