Pune Metro News :- पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टिकोनातून पुणे मेट्रोची भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये पुणे मेट्रोची पायाभरणी केली होती व मार्च 2022 मध्ये त्यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले होते. पिंपरीतील पीसीएमसी मुख्यालय ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज पर्यंत असलेल्या दोन मार्गांचे देखील उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केलेले होते.
आता पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्ग देखील उद्घाटनाच्या प्रत्यक्षात असून मीडिया रिपोर्ट नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्याकरिता पुण्यात येणार असल्यामुळे या त्यांच्या दौऱ्यामध्ये पुण्यातील मेट्रो मार्गाचे देखील उद्घाटन करणार असल्याची शक्यता आहे. एक ऑगस्टला पुणे मेट्रोच्या या टप्प्याचे उद्घाटन झाले तर पुणे शहरात मेट्रो गरवारे कॉलेज तर रुबी हॉल क्लिनिक दरम्यान तर पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान थेट मेट्रो सेवेला सुरुवात होणार आहे.
पूर्वी वनाज ते गरवारे मार्गावर मेट्रोचे वाहतूक सुरू झालेली होती व तिचा विस्तार आता रुबी हॉल क्लिनिक पर्यंत केला गेला आहे. यामध्ये पुणेकरांसाठी खुशखबर अशी आहे की पुण्यात मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे एक ऑगस्टला उद्घाटन झाल्यावर पुणेकरांना पीएमपी बसच्या तिकीट दरात मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.
याकरिता वनाज ते रुबी हॉल मार्गाकरिता 25 रुपये तर पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यानच्या प्रवासाकरिता 30 रुपये तिकीट असणारा असून मेट्रो साठीचे कमीत कमी तिकीट हे दहा रुपये इतके आहे. पुणे शहराचा विचार केला तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यान आणि पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर कोर्टापर्यंत थेट मेट्रो सेवेला सुरुवात होणार असून याआधी वनाज ते गरवारे मार्गावर मेट्रोची सेवा सुरू आहे. आता या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर रुबी हॉल क्लिनिक पर्यंत ही मेट्रो धाऊ शकणार आहे.
इतका असेल तिकीट दर
पुण्यात मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे एक ऑगस्टला उद्घाटन झाल्यानंतर जवळपास पीएमपी बसच्या तिकीट दरातच प्रवाशांना आता मेट्रोतून प्रवास करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता या नवीन विस्तारित मार्गावर प्रवास करायचा असेल तर गरवारे कॉलेज तर रुबी हॉल दरम्यानच्या प्रवास करण्याकरिता प्रवाशांना वीस रुपये तिकीट दर असेल.
तर त्यासोबत पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी मार्गावर सध्या मेट्रो सेवा सुरू आहे. आता या मार्गाचा विस्तार करण्यात आला असून फुगेवाडी पासून ते शिवाजीनगर न्यायालया दरम्यान मेट्रो धावणार आहे. या दोन्ही ठिकाणादरम्यान प्रवास करायचा असेल तर प्रवासांना 25 रुपये तिकिटाचा दर असणार आहे. त्यामुळे नक्कीच सर्वसामान्य पुणेकरांना कमीत कमी तिकीट दरामध्ये आता जलद आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.