Crop Nutrition Management : खतांची कार्यक्षमता आणि शेती उत्पादनामध्ये करा वाढ, ही विशेष खते ठरतील फायद्याचे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Nutrition Management:- पिकांच्या उत्पादन वाढीकरिता संतुलित पोषक द्रव्यांचा पुरवठा हा महत्त्वाचा असतो. तसेच खतांची कार्यक्षमता हा देखील एक महत्त्वाचा विषय असून याकडे देखील लक्ष देणे खूप गरजेचे असते. रासायनिक खते देण्याला जितकं महत्त्व आहे तेवढेच त्या खतांचा वापर किंवा त्या खतांचा उपयोग पिकांना किती होत आहे हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर नत्राची कमतरता भरून काढण्यासाठी युरिया चा वापर मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात.

परंतु युरियाची कार्यक्षमता पाहिली तर ती तीस ते चाळीस टक्के इतकीच असते. त्यामुळे साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत युरिया वाया जातो व त्यामुळे आर्थिक नुकसान होते. तसेच युरियाचा जास्त वापर देखील हानिकारक आहे. युरीयाचा वापर केल्यामुळे पिकांना हिरवापणा आणि लुसलुशीतपणा मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव देखील वाढतो व पिकांची फक्त शाकीय वाढ होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर खतांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि शेतीच्या उत्पादनात देखील वाढ होण्याकरिता काही पर्यायी खताचा वापर महत्त्वाचा ठरतो. या लेखामध्ये अशाच महत्त्वाच्या काही विशेष खतांची माहिती घेणार आहोत.

पिक उत्पादनासाठी महत्त्वाची पर्यायी खते
1-नॅनो डीएपी- हे एक द्रवरूप खत अलीकडेच बाजारात मध्ये आले असून यामध्ये 8.0 टक्के नायट्रोजन आणि 6.0 टक्के फॉस्फरस आहे. जर आपण या खताच्या डीएपीच्या कणांचा आकार पाहिला तर तो 100 नॅनो मीटर पेक्षा देखील कमी असल्यामुळे ते पानांच्या रंधरांच्या माध्यमातून आणि वनस्पतीच्या इतर क्षेत्रातून सहजपणे आत प्रवेश करते. एवढेच नाही तर नॅनो डीएपी ची चांगल्या प्रसाराची क्षमता आणि वनस्पतीच्या एकंदरीत प्रणालीमध्ये एकत्रीकरण केल्यामुळे बियाण्याला देखील अधिक जोमदारपणा येतो. याच्या वापरामुळे पिकाची प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता सुधारते तसेच पिकाचे गुणवत्ता आणि उत्पादनात देखील वाढ होते.

2- सल्फर लेपीत युरिया- जमिनीमध्ये जर सल्फर ची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी सल्फर लेपित युरियाला सरकारने मान्यता दिलेली आहे. हा इतर खतांच्या प्रकारापेक्षा अधिक कीफायतशीर आणि कार्यक्षम असून याची नायट्रोजन शोषण कार्यक्षमता 78% इतके आहे. यामध्ये खताचे दीर्घायुष्य वाढावे याकरिता ह्युमिक ऍसिड देखील मिसळले आहे. या युरियाच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्यात सुधारणा होते तसेच खर्चात बचत तर होतेच परंतु उत्पादन देखील वाढवणे शक्य आहे.

3- पॉली फोर- यामध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया नसून आणि उत्पादनाच्या दरम्यान कार्बन फुटप्रिंट कमी असलेले हे पॉली फोर खत सेंद्रिय शेतीसाठी योग्य आहे. हे खत पूर्ण हंगामामध्ये पिकांसाठी पोषण पुरवते तसेच हे नैसर्गिकरीत्या तयार केलेले व कमी क्लोराईड असलेले व अनेक प्रकारची उपयुक्त पोषक द्रव्य असलेले खत असून पिकाच्या उत्पादन वाढीकरिता खूप महत्त्वाचे खत आहे. या खतांमध्ये सल्फर 19% तसेच पोटॅशियम 14%, मॅग्नेशियम सहा टक्के आणि कॅल्शियम 17 टक्के अशाप्रकारे पोषणद्रव्य आहेत. या खताचे वैशिष्ट्य म्हणजे हे विद्राव्य खत असून पिकाला अगदी नियमितपणे पोषक द्रव्यांचा पुरवठा करते. एवढेच नाही तर जमिनीतून महत्त्वाची पोषक द्रव्य ग्रहण करण्याची क्षमता देखील वाढवते. एमओपी खताच्या तुलनेत पॉलीफोर हे गहू पिकासाठी देखील महत्वपूर्ण असून या माध्यमातून गहू पिकाला नियमितपणे सल्फेट सल्फर खत उपलब्धता देते.

4- पोटॅश डेरीव्हड फ्रॉम मोलॅसिस( पीडीएम खत)- हे एक एफसीओ मान्यता प्राप्त खत असून यामध्ये 14.5% पालाश आहे. सध्या आपण म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच एमओपी चा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. परंतु या खताची संपूर्णपणे आपल्या देशाला आयात करावी लागते. त्यामुळे त्याचे दर देखील जास्त असतात. त्यामुळे या खताला पर्याय म्हणून साखर कारखान्यातील जे काही उपपदार्थ असतात त्या उपपदार्थ निर्मित मोलॅसिस पासून जे काही राख तयार होते. त्या राखेपासून हे खत तयार केले जाते. त्यामुळे हे खत एमओपी ला उत्तम असा पर्याय आहे. या खतामध्ये साधारणपणे 14.5% पालाश असते.

Leave a Comment