Pune Metro : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. यासोबतच, पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार देखील खूपच जलद गतीने होत आहे. याचा परिणाम म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सध्या स्थितीला असणारी वाहतूक व्यवस्था तोकडी ठरु लागली आहे.
यामुळे सध्या स्थितीला शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि जलद व्हावा यासाठी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली आहे. वास्तविक, 2022 पूर्वी पुणे शहरातील नागरिकांना प्रवासासाठी केवळ बसचा पर्याय उपलब्ध होता.
मात्र 2022 मध्ये सर्वप्रथम पुणे शहरात मेट्रो धावली. यानंतर दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पुणे शहराला दोन नवीन मेट्रो मार्ग मिळालेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लीनिक या दोन मार्गांवर महामेट्रोने मेट्रो सेवा सुरू केली आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
जेव्हापासून हे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत तेव्हापासून शहरातील नागरिकांचा प्रवास खूपच जलद आणि सुरक्षित झाला आहे. विशेष म्हणजे प्रवाशांनी या दोन्ही मेट्रो मार्गांना भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. हेच कारण आहे की, महामेट्रोच्या माध्यमातून या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्तार देखील जलद गतीने केला जात आहे.
महामेट्रोकडून सध्या स्थितीला शिवाजीनगर सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा संपूर्ण मार्ग 5 किलोमीटर लांबीचा आहे, विशेष म्हणजे हा संपूर्ण मार्ग भुयारी आहे. तसेच हा मार्ग मार्च 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हा संपूर्ण प्रवास मार्च 2024 नंतर मेट्रोने होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे.
खरंतर, सध्या पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर सिविल कोर्ट दरम्यानच्या मेट्रो मार्गाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे यामुळे सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाला देखील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा महामेट्रोकडून व्यक्त होत आहे. पुण्यातील नागरिकांना देखील या मेट्रो मार्गाची आतुरता लागून आहे.
याशिवाय वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हा मार्ग सध्या स्थितीला सुरुवात रुबी हॉल क्लीनिक ते रामवाडी या मार्गाचे काम देखील पूर्ण झाले आहे. या मार्गावर यशस्वी ट्रायल रन देखील घेण्यात आली आहे. यामुळे आता हा मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत सुरु होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.