Pune-Nagpur Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई, सणासुदीचा हंगाम या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र सध्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रेल्वे मार्गांवर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गर्दी होत आहे.
दरम्यान हिच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुणे आणि राज्याची उपराजधानी नागपूर या दोन शहरादरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून यामुळे या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे हे देखील समजून घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
खरेतर पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. परंतु सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरू असल्याने या हंगामात ही गर्दी आणखी वाढते.
याच पार्श्वभूमीवर पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल रेल्वे नागपूर-पुणे द्विसाप्ताहिक विशेष गाडी 13 एप्रिल ते 15 जून पर्यंत दर शनिवारी आणि सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी सोडणार आहे.
ही गाडी दुसऱ्या दिवशी अकरा वाजून 25 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. पुणे-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 14 एप्रिल ते 16 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी पुणे येथून दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. पुणे-नागपूर या गाडीच्या 19 फेऱ्या आणि नागपूर-पुणे या गाडीच्या 19 फेऱ्या अशा एकूण 38 फेऱ्या होणार आहेत.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी या मार्गावरील तेरा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाईन आणि उरळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर पुणे-नागपूर-पुणे या विशेष द्विसाप्ताहिक ट्रेनला थांबा मंजूर करण्यात आला आहे.