काय सांगता ! बेडकाची शिकार करणारा साप ‘या’ जातीच्या बेडकाला खूपच घाबरतो, हा बेडूक विषारी सापालाही खातो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Viral News : साप हा एक सरपटणारा विषारी जीव आहे. मात्र सर्वच साप विषारी नसतात, काही बिनविषारी देखील आहेत. आपल्या देशात तर विषारी सापांच्या तुलनेत बिनविषारी सापांचीच संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. मात्र साप विषारी असो किंवा बिनविषारी त्याला पाहताच क्षणी आपला थरकाप उडतो.

साप समोर दिसला की पायाखालची जमीन सरकते. मात्र अनेकजण सापाला घाबरून त्याच्यावर हल्ला करतात आणि साप मारतात. पण, सापाला मारणे, त्याला इजा पोचवणे हे अयोग्य आहे.

कारण की सापाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या प्राण्याची पर्यावरणाला गरज आहे. साप हा अन्नसाखळीचा एक अविभाज्य घटक आहे. तुम्हाला तर माहीतच असेल की साप बेडूक, मासे, उंदीर असे प्राणी खात असतो.

सापाचे हे अन्न आहे. याच अन्नाच्या शोधात साप अनेकदा मानवी वस्तीमध्ये घुसतो. अन्नाच्या शोधात साप घरात सुद्धा घुसतो.

मात्र आज आपण अशा एका बेडकाची माहिती पाहणार आहोत जो की चक्क सापाला खातो. कितीही विषारी साप असला तरी देखील हा बेडूक त्या सापाला खाऊन टाकतो.

कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र बेडकाची अशी एक प्रजाती आहे जी सापाची शिकार करते. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.

हा बेडूक करतो सापाची शिकार

मिळालेल्या माहितीनुसार, जगात बेडकाची अशी एक प्रजाती आहे जी सापाला खाते. या जातीचे नाव आहे आफ्रिकन बुलफ्रॉग. या आफ्रिकन बुलफ्रॉग जातीचे बेडूक चक्क सापांची शिकार करतात. खरेतर सापाचे अन्न बेडूक हेच आहे.

मात्र आफ्रिकन बुलफ्रॉग या बेडकाच्या जातीचे अन्न साप आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीच्या बेडकाची सरासरी लांबी 10 ते 12 इंच एवढी असते. सापाची शिकार करणाऱ्या या बेडकाचे सरासरी वजन हे जवळपास 1.4 किलो ते 2 किलोग्रॅम एवढे असते.

कधीकधी त्यांचे वजन 3 ते 3.4 किलोपर्यंत जाते. पण, हा बेडूक आपल्या भारतात आढळत नाही. तज्ञांच्या मते असा बेडूक फक्त आफ्रिकेतच आढळतो. आफ्रिकन बुलफ्रॉग्स खूपच विषारी असतात.

हे बेडूक आफ्रिकेत टांझानिया, अंगोला, बोत्सवाना, केनिया, मलावी, मोझांबिक, नामिबिया, दक्षिण आफ्रिका, स्वाझीलँड, झांबिया, झिम्बाब्वे आणि काँगोमध्ये आढळतात. आफ्रिकन बुलफ्रॉग वर्तनात खूपच आक्रमक आणि धोकादायक असतात.

Leave a Comment