Pune News : येत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा पर्व मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. खरतर हा राष्ट्रीय सण सर्व भारतीयांसाठी खास राहतो. मात्र यावर्षी हा राष्ट्रीय सण पुणेकरांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, 15 ऑगस्टपूर्वी पुणेकरांना एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट पूर्वी पुणेकरांसाठी एका महत्त्वाच्या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
पुणे शहरातील चांदणी चौक पुलाचे 12 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे. बहुचर्चित चांदणी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून आता हा पूल लोकार्पणासाठी रेडी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या पुलाचे येत्या दोन दिवसात अर्थातच 12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, चांदणी चौकातील जुना पूल 2022 मध्ये क्षतीग्रस्त करण्यात आला होता. चांदणी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती परिणामी हा जुना पूल पाडून नवीन पुल बांधण्याची योजना आखण्यात आली होती. यानुसार जुना पूल पाडण्यात आला असून आता नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अशातच या नव्याने बांधण्यात आलेल्या चांदणी चौक पुलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ट्विटरवर चांदणी चौक पुलाचा विडिओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये चांदणी चौक पुलाची सुंदरता कैद करण्यात आली आहे. पुणेकरांनी हा व्हिडिओ अक्षरशः डोक्यावर घेतला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, चांदणी चौक परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र हा पूल सुरू झाला तर ही वाहतूक कोंडी फुटेल आणि संबंधित भागातील प्रवाशांना दिलासा मिळेल असा आशावाद नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.