Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील विमान प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. खरे तर, शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही दशकांमध्ये रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
याचा परिणाम म्हणून देशांतर्गत दळणवळण व्यवस्था चांगली मजबूत झाली आहे. याशिवाय विमान वाहतूक देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे.
यासाठी विविध एअरलाइन्स कंपन्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात विमानाची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास देखील सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अशातच आता पुण्याहून सिंगापूरला थेट विमान सेवा सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर पुण्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक सिंगापूरला जात असतात.
मात्र सिंगापूरला जाण्यासाठी पुण्यातील नागरिकांना राजधानी मुंबईला जाऊन विमान पकडावे लागते. म्हणजेच पुणे विमानतळावरून सिंगापूर साठी थेट विमानसेवा नाही. यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
यामुळे सिंगापूरला जाणाऱ्या विमान प्रवाशांच्या माध्यमातून पुण्याहून सिंगापूर साठी थेट विमान सेवा सुरू केली गेली पाहिजे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केली जात होती. दरम्यान पुणेकरांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. आता पुण्याहून थेट सिंगापूरसाठी आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा सुरू होणार आहे.
डिसेंबरच्या मध्यापासून ही विमानसेवा विस्तारा एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून सुरू केली जाणार असल्याचे वृत्त लोकमत या प्रतिष्ठित वृत्त संस्थेने प्रकाशित केले आहे. विस्तारा एअरलाइन्स कंपनीने या संदर्भात सर्व आवश्यक नियोजन पूर्ण केले आहे.
यामुळे आता लवकरच ही विमान सेवा सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. खरे तर सध्या स्थितीला पुणे विमानतळावरून इंडिगो स्पाइस जेट या एअरलाइन्स कंपनीच्या थेट सिंगापूर साठी विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र या सेवेची संख्या खूपच मर्यादित आहेत.
या मार्गावर दररोज विमानाने उड्डाणं भरले पाहिजे अशी मागणी नागरिकांची आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता विस्तारा एअरलाइन्स आठवड्यातून सहा दिवस या मार्गावर विमानसेवा सुरू करणार आहे.
मात्र ही विमान सेवा नेमक्या कोणत्या तारखेला सुरू होणाऱ याबाबत कंपनीच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि या विमानसेवेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या विस्तारा एअरलाइन्स कंपनीला मिळाल्या आहेत. यामुळे ही सेवा लवकरच सुरू होणार असा दावा केला जात आहे.