शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ‘इतकी’ मदत देणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. 25 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे काही भागात गारपीट देखील झाली आहे. अवकाळी पावसाने आणि गारपीटीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

विशेष बाब अशी की आज देखील हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर आज 30 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गारपिट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला खास पुन्हा एकदा पावसामुळे हिरावला जाणार आहे. यामुळे अवकाळी ग्रस्त आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा दिला गेला पाहिजे अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने देखील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने अवकाळी पावसा संदर्भात आणि गारपिटी संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आहे. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत तातडीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे.

खरे तर या आढावा बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. या बैठकीत अवकाळी मुळे राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 4 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचा एक महत्त्वाचा अंदाज देण्यात आला आहे.

यामुळे या बाधित क्षेत्रावरील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने काम सुरू करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांना देखील संबंधित जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत देण्याचे आदेशित केले आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना बाधित शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे सांगितले गेले आहे.

किती मदत मिळणार बर ?

या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ८,५०० रु., आश्वासित सिंचनाखालील शेतीसाठी हेक्टरी १७,००० रु. आणि बागायती पिकांसाठी हेक्टरी २२,५०० रु. एवढी मदत तीन हेक्टर च्या मर्यादेत दिली जाणार आहेत.

सोबतच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांस ४ लाख रु., ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास २.५ लाख रु., जखमींना ७४ हजार रु., घराची पडझड झाल्यास ४ हजार ते ६.५ हजार रु. एवढी मदत मिळणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले आहे.

यामुळे निश्चितच अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. तथापि शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यामुळे आता शासन याबाबत केव्हा निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment