Pune News : पुणे शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मात्र संपूर्ण शहरात मेट्रो पोहोचण्यासाठी आणखी बऱ्याच वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत आजही शहरात प्रवासासाठी पीएमपीएलची बससेवा अधिक प्रभावी असल्याचे चित्र आहे. पी एम पी एल च्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
ज्याप्रमाणे मुंबईमध्ये लोकल ट्रेन तेथील लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते त्याच धर्तीवर पुणे शहरातील पीएमपीएल ची बस सेवा येथील लाईफ लाईन आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीच्या याच लाईफलाईन संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे शहरातील एका महत्त्वाच्या मार्गांवर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
वारजे सिप्ला हॉस्पिटल ते पुणे मनपा भवन या मार्गांवर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मार्गावर आधी पीएमपीएलची बस सेवा सुरू होती.
मात्र काही कारणांमुळे ही बस सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद होती. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
परिणामी ही बंद झालेली बस सेवा लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे अशी मागणी येथील स्थानिकांनी केली होती.
यासाठी पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केलेत.
दरम्यान याच प्रयत्नांना आता यश आले असून कालपासून या मार्गांवर बस सेवा सुरू झाली आहे. आता ही बससेवा सुरू झाल्याने हॉस्पिटलमध्ये जाणे-येणे सोयीचे होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
दरम्यान पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी या बससेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, या बसला चांगला प्रतिसाद दाखवावा असे आवाहन यावेळी केले आहे.