Pune News : शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे.
या दोन्ही शहरातील औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण झपाट्याने वाढले आहे. याचा परिणाम म्हणून शहरात आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शहरातील सध्याची वाहतूक व्यवस्था देखील अपुरी पडत आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील सध्याची वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्याने आता शहरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच पीएमपीएलच्या बसेस देखील शहरातील वेगवेगळ्या मार्गावर चालवल्या जात आहेत.
खरतर जेव्हा शहरात मेट्रो धावत नव्हती तेव्हा पीएमपीएल बस हा एकमेव प्रवासी पर्याय नागरिकांच्या पुढ्यात होता. पण आता मेट्रोमुळे नागरिकांचा प्रवास जलद आणि गतिमान झाला आहे.
मात्र असे असले तरी अजूनही शहरातील काही मोजक्याच भागातील प्रवाशांना मेट्रोची भेट मिळाली आहे. शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोनच मार्गावर सध्या स्थितीला मेट्रोची सेवा सुरू आहे.
इतर भागातील नागरिकांना मात्र अजूनही प्रवासासाठी पीएमपीएलच्या बसेसवरच अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे ज्या भागात Metro आणि पीएमपीएलची बस सेवा नाही त्या ठिकाणी पीएमपीएल बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केली जात आहे.
अशातच आता पुणेकरांच्या सोयीसाठी शहरातील एका महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील वाघोली ते शिरूर या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
खरंतर ही बस सेवा सुरू करण्यासाठी येथील नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने मागणी केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान आता आपण वाघोली ते शिरूर अर्थातच शासकीय विश्रामगृह दरम्यान पीएमपीएलच्या बससेवेचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक ?
वाघोली ते शिरूर या मार्गावर सकाळी वाघोली येथून 5:40 आणि 6:20 वाजता आणि दुपारी 2:20 आणि 3 वाजता पी एम पी एल ची बस सुटणार आहे. तसेच शिरूर ते वाघोली या मार्गावर शिरूर येथून सकाळी 10:50 आणि 11: 40 वाजता तसेच सायंकाळी 7:50 आणि 8: 30 वाजता पीएमपीएलची बस सुटणार आहे.