पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी ठरणार महत्त्वाचे ! कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : सध्या संपूर्ण देशात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. यंदाच्या दिवाळीत मात्र अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे.

अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे शेती पिकांवर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या कोकणात भात पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. विदर्भातील प्रमुख भात उत्पादक पट्ट्यांमध्येही धानाची काढणी सुरू असून काही भागात सोयाबीन आणि कापूस हार्वेस्टिंग सुरू आहे.

याशिवाय रब्बी हंगामातील पीक पेरणीला देखील वेग आला आहे. अशातच आता राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. पण या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळणार आहे.

यंदा मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत खूपच कमी पाऊस झाला आहे यामुळे सध्याचा अवकाळी पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक राहणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

दरम्यान काल अर्थातच धनत्रयोदशीच्या दिवशी राज्यातील मुंबई, पुणेसह मध्य महाराष्ट्रातील आणि दक्षिण कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.

विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासात राज्यातील विविध भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

कुठे बसणार अवकाळी पाऊस ?

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राजधानी मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे.

तसेच दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष बाब अशी की कोकण आणि मध्य महाराष्ट्र सोबतच मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांची काळजी घेण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.

तसेच हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नागरिकांनी पावसाचे वातावरण पाहूनच घराबाहेर पडावे असे सांगितले गेले आहे.

Leave a Comment