राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार, राज्य शासनाचा महत्त्वाचा प्रस्ताव तयार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अर्थातच रिटायरमेंट एज वाढवले जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे.

मात्र गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. अर्थातच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात तफावत आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे आहे. यासोबतच देशातील जवळपास 25 घटक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे करण्यात आले आहे.

मात्र राज्य शासकीय सेवेतील गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्रीय कर्मचाऱ्यांपेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षे वाढ दिली पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे.

यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. वर्तमान राज्य सरकारकडे देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. या मागणीसाठी संबंधितांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली आहेत.

जुनी पेन्शन योजनेसोबतच सेवानिवृत्तीचे वय वाढवणे या मागणीसाठी मार्च 2023 मध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप देखील पुकारला होता. त्यावेळी जुनी पेन्शन योजनेवर तोडगा काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती.

पण अद्याप या समितीचा अहवाल शासनाला मिळालेला नाही. परंतु 20 नोव्हेंबर पर्यंत या समितीचा अहवाल शासनाकडे जमा होणार आहे. तदनंतर जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा यावेळी व्यक्त केली जात आहे.

यासोबतच आता राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले जाईल असे देखील वृत्त समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार झाला आहे.

विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्ताव आता येत्या अधिवेशनात मंजूर केला जाणार आहे. येत्या अधिवेशनामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य सचिवांसोबत कर्मचारी संघटनांची एक बैठक झाली होती. या बैठकीत मुख्य सचिवांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत शासन दरबारी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधितांना दिली होती.

यामुळे येत्या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे. निश्चितच राज्य शासनाने जर येत्या अधिवेशनात याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांना दोन वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment