Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी शहरातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो संदर्भात आहे. खरे तर सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर सध्या स्थितीला मेट्रो धावत आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. सिविल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोमार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या उन्नत मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या उन्नत मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असल्याने आता या मार्गाचे उद्घाटन देखील होणार आहे. या मार्गाच्या उद्घाटनाची तारीख सुद्धा फायनल करण्यात आली आहे.
केव्हा होणार उद्घाटन ?
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या मार्गाचे उद्घाटन गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. 19 फेब्रुवारी 2024 ला या मार्गाचे उद्घाटन होणार असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात होता.
मात्र या नियोजित वेळेत हे उद्घाटन संपन्न होऊ शकले नाही. खरेतर या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार होते यामुळे या दौऱ्यात या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्याचा प्लॅन होता. मात्र पंतप्रधान महोदयांचा पुणे दौरा लांबला आहे.
यामुळे रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे केव्हा उद्घाटन होणार ? हा सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात होता.
आता मात्र या मार्गाच्या उद्घाटनाची तारीख फायनल झाली आहे. 6 मार्च 2024 ला अर्थातच येत्या चार दिवसात या मार्गाचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
या मार्गावर एकूण पाच स्थानके तयार झाली असून यामुळे पुणेकरांचा प्रवास आधीच्या तुलनेत आणखी सोयीचा होणार अशी आशा व्यक्त होत आहे.