पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ भागात फक्त 20 लाखात मिळतोय 1 बीएचके फ्लॅट, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Property News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील ओळखतात. शहरात विविध शैक्षणिक संस्थानांनी आपले बस्तान बसवले आहे. अलीकडे शहरांमध्ये विविध आयटी कंपन्या देखील दाखल झाल्या आहेत.

यामुळे विद्येचे माहेरघर आता गजबजू लागले आहे. शहराचा दिवसेंदिवस मोठा विकास होत आहे. परिणामी आता पुण्यात घर घेणे म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होऊन बसली आहे. पण असे असले तरी शहरात असेही अनेक भाग आहेत जिथे सर्वसामान्यांना बजेटमध्ये घरे मिळत आहेत.

दरम्यान आज आपण पुण्यातील अशाच एका मोक्याच्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या निसर्गरम्य ठिकाणाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही पुण्यात निसर्गरम्य ठिकाणी स्वस्तात, अगदी बजेटमध्ये घर हवे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.

खरे तर अलीकडे पुणे शहरात घरांच्या किमती करोडोच्या घरात गेल्या आहेत. यामुळे आता पुण्याला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात घराची खरेदी वाढू लागली आहे. यामध्ये पुण्याला लागून असलेल्या मुळशी तालुक्यातील भुकूम या गावात देखील घर घेणाऱ्यांची संख्या अलीकडील काही वर्षांमध्ये मोठी वाढली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये या गावाचा मोठ्या झपाट्याने विकास झाला आहे. हे गाव पुणे शहरापासून अवघ्या 18 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. यामुळे या ठिकाणी घर घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या गावाच्या आजूबाजूचा परिसर चांगला विकसित आहे.

हा एक निसर्गरम्य आणि सुंदर परिसर आहे. परिणामी येथे गुंतवणुकीसाठी आणि वास्तव्यासाठी गृह खरेदी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या गावाच्या जवळपास रुग्णालय, शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठ उपलब्ध आहे. मूलभूत सुविधा गावालगत असल्याने येथे गुंतवणूक करणाऱ्यांना नजीकच्या काळात निश्चितच चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे हा परिसर राहण्यासाठी देखील सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. या गावात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे. या गावातून पुणे शहरात जाण्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. हे गाव मुख्य मुळशी रस्त्याला जोडले गेलेले आहे. हा रस्ता NH 48, लव्हळे रस्ता टेमघर लवासा रस्त्याला जोडतो. म्हणजेच हे रस्ते पुणे शहरातील महत्त्वाच्या भागांना भुकूमला जोडतात.

या गावातून बेगडेवाडी रेल्वे स्टेशन फक्त 32 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या गावातून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ वसलेले आहे. यामुळे अलीकडे या भागात मालमत्ता खरेदी करण्याचा कल वाढलाय. या ठिकाणी अनेक निवासी भूखंड आणि बहुमजली अपार्टमेंट तयार झालेली आहेत.

यामुळे येथे नागरिकांना गृह खरेदीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स मिळतं आहेत. या ठिकाणी शहरातील अनेक नामांकित बांधकाम व्यवसायिकांनी आपले प्रकल्प पूर्ण केलेली आहेत. या गावापासून जवळच वेगवेगळे शैक्षणिक संस्थान आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भागात 1 बीएचके घरांच्या किमती 20 ते 45 लाखांच्या घरात आहेत, तसेच 2 बीएचके घरांच्या किमती 35 ते 70 लाखांच्या घरात आहेत. 3 बीएचके घरांच्या किमती 60 लाखांपासून ते सव्वा कोटी रुपयांच्या घरात आहेत. या ठिकाणी दीड कोटींपासून पुढे बंगलो उपलब्ध होतो. या ठिकाणी प्लॉट देखील उपलब्ध आहेत. प्लॉटच्या किमती सरासरी 4700 ते 6400 रुपये प्रति स्क्वेअर फुट अशा आहेत.

Leave a Comment