पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ महत्त्वाच्या एक्सप्रेस ट्रेनला जेजुरीत मिळाला थांबा, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील विशेषता जेजुरी मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जेजुरी रेल्वे स्थानकात एका लांब पल्ल्याच्या अति महत्त्वाच्या एक्सप्रेस गाडीला थांबा देण्यात आला आहे.

यामुळे जेजुरी येथील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार निजामुद्दीन ते गोवा दरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला जेजुरी या रेल्वे स्थानकावर आता नवीन थांबा राहणार आहे.

खरंतर येथील प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीला जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे आणि प्रशासनाकडे या एक्सप्रेस गाडीला जेजुरीला थांबा मिळावा यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.

दरम्यान सुप्रिया सुळे यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून आता निजामुद्दीन ते गोवा दरम्यान धावणारे एक्सप्रेस गाडीला जेजुरी येथे थांबा देण्यात आला आहे. यामुळे येथील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून आजपासून या नवीन थांब्यावर ही एक्सप्रेस गाडी थांबणार आहे.

विशेष बाब म्हणजे निजामुद्दीन ते गोवा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला जेजुरी थांबा मिळाला असल्याने आता इतरही लांब पल्ल्याच्या गाड्यांना या अति महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी प्रवाशांची मागणी आणखी जोर धरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वास्तविक, जेजुरी हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जेजुरी ही खंडोबारायांची नगरी. या नगरीत देशभरातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. अशा परिस्थितीत खंडोबारायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी जेजुरीमध्ये लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा देण्याची मागणी होती.

निजामुद्दीन ते गोवा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसला देखील या रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी होती. आता ही मागणी पूर्ण झाली असून निजामुद्दीन ते गोवा एक्सप्रेस जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. यामुळे रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

Leave a Comment