Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यासहित संपूर्ण देशात प्रवासासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असून रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे भारतात कोणत्याही शहरात प्रवास करायचा असेल तर रेल्वे उपलब्ध होते.
हेच कारण आहे की रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. दरम्यान याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की पुण्याहून एक विशेष एक्सप्रेस गाडी धावणार आहे.
अमरावती ते सातारा या मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही शहरा दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी पुण्यामार्गे धावणार असल्याने पुण्यातील रेल्वे प्रवाशांचा साताराकडील तसेच विदर्भाकडील प्रवास आधीच्या तुलनेत जलद आणि सुलभ होईल अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती-सातारा ही विशेष एक्सप्रेस गाडी 23 जानेवारीला सुरू झाली आहे. दुसरीकडे सातारा-अमरावती ही विशेष एक्सप्रेस गाडी 28 जानेवारीला धावणार आहे.
ही ट्रेन सातारा येथून 28 जानेवारीला साडेचार वाजता अमरावतीकडे रवाना होईल आणि 29 जानेवारीला अकरा वाजता अमरावतीला पोहोचणार अशी माहिती समोर आली आहे.
अमरावती-सातारा अनारक्षित गाडी सुरू झाली असल्याने खानदेश मधील प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा लाभ मिळणार आहे. भुसावळ येथून पुण्याला जाऊ इच्छिणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.