Pune Railway Station : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. तसेच काहीजण पिकनिक साठी बाहेरगावी जात आहेत. उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने अनेकांनी आपल्या परिवारासमवेत देवस्थानांना जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने अयोध्या येथे देखील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र अयोध्या येथे दर्शनासाठी जात आहेत. जर तुमचाही या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अयोध्याला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते आयोध्या दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. पुणे ते अयोध्या अशा दोन आणि अयोध्या ते पुणे अशा दोन अशा एकूण चार विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे.
विशेष बाब अशी की या समर स्पेशल ट्रेनला उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकावर देखील थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासहित उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना देखील रामरायाचे दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तसेच, ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार आणि या गाडीने प्रवास करण्यासाठी किती तिकीट लागणार यासंदर्भात देखील अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-अयोध्या विशेष गाडी (ट्रेन क्रमांक ०१४५५) ही गाडी ३ मे आणि ७ मे ला पुणे रेल्वे स्थानकावर होणार रात्री साडेसात वाजता सोडले जाणार आहे आणि ही गाडी तिसऱ्या दिवशी अयोध्याला सकाळी ८.५० वाजता पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्र. ०१४५६ ही समर स्पेशल ट्रेन अयोध्या रेल्वे स्थानकावरून ५ मे आणि ९ मे ला दुपारी ४ वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी पुण्याला तिसऱ्या दिवशी दुपारी ३.५५ वाजता पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
ही गाडी या मार्गावरील 16 महत्वाच्चा रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना, झाशी, ओराई, कानपूर आणि लखनौ या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.
एकंदरीत ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील मनमाड, जळगाव भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याने येथील प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
तिकीट दर कसे राहणार ?
या गाडीने प्रवास करण्यासाठी स्लीपर कोचसाठी ६७५ रुपये, एसीसाठी १७७५ तर जनरलसाठी ३१५ रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती रेल्वे कडून प्राप्त झाली आहे.