पुणे रिंग रोड बाबत मोठी अपडेट ! केव्हा सुरु होणार काम, प्रकल्पाची सद्यस्थिती काय ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road Project : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास खूपच आव्हानात्मक झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे रिंग रोड हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकल्पाबाबत नुकतेच एक मोठे अपडेट समोर आले आहे. सध्या स्थितीला पुणे रिंग रोडचे भूसंपादन युद्धपातळीवर सुरू आहे.

हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे. हा प्रकल्प 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा बाह्य वर्तुळाकार रस्ता प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला पश्चिम भागातील भूसंपादन हाती घेण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पश्चिमेकडील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. पश्चिमेतील 34 गावांपैकी 31 गावांचे 644 हेक्टर जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

या पश्चिम भागात बाधित झालेल्या संबंधित जमीन धारकांना त्यांचा मोबदला देखील वितरित करण्यात आला आहे. संबंधित जमीनधारकांना 2975 कोटी रुपयांचा मोबदला आत्तापर्यंत वितरित झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.

दरम्यान भोर तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश करण्यात आला असल्याने या गावात सध्या जमीन आणि जमिनीचे दर ठरवण्याचे काम सुरू आहे.

तोवर मात्र पूर्व रिंग रोडसाठी हवेली, मावळ, खेड आणि पुरंदर तालुक्यातील जमिनीच्या भूसंपादनाबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्व भागातील रिंगरोड हा मावळ तालुक्यातील ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांमधून जात आहे.

ध्या खेड तालुक्यातील भूसंपादनासाठी संबंधित बाधित गावातील शेतकऱ्यांना नोटीसा पाठविल्या जात आहेत. खेडमधील बाधित शेतकऱ्यांना स्वयंघोषणापत्र देण्यासं एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती.

दरम्यान, ही मुदत आता संपुष्टात आली असल्याने त्याच्याकडून स्वयंघोषणापत्र घेण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उर्वरित गावातही तातडीने भूसंपादन करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे.

त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होईल, पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल असे म्हटले जात आहे.

Leave a Comment