Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडणार असे नाही तर यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने एका अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा सबंध महाराष्ट्राला फायदा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी प्रशासन आणि शासन यांच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहे.
अशातच या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत 172 किलोमीटर लांबीचा बाह्य रिंग रोड विकसित केला जाणार आहे. या रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात केले जाणार आहे. यानुसार सध्या पश्चिम रिंग रोडसाठी भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
दरम्यान याच पश्चिम रिंग रोडबाबत एक महत्त्वाची आणि मोठी माहिती हाती आली आहे. ती म्हणजे आतापर्यंत पश्चिम भागातील रिंग रोड साठी 160 हेक्टर जमिनीचे संमतीने संपादन झाले आहे. या पश्चिम रिंग रोडसाठी जवळपास 700 हेक्टर जमीन संपादित करावे लागणार आहे.
म्हणजेच प्रशासनाला आणखी सव्वा पाचशे हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. दरम्यान आता उर्वरित जमिनीचे सक्तीने संपादन करण्याची योजना जिल्हा प्रशासनाने आखले आहे. हे सक्तीने भूसंपादन करताना मात्र बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा लागणार आहे.
खरंतर, जिल्हा प्रशासनाला भूसंपादनासाठी 1000 कोटी रुपये प्राप्त झाले होते. यापैकी 830 कोटी रुपये 160 हेक्टर जमिनीच्या मोबदल्यात संबंधित शेतकऱ्यांना देऊ करण्यात आले आहेत. आता उर्वरित जमिनीच्या संपादनासाठी 3000 कोटी रुपयांची गरज आहे.
त्यामुळे आता हे तीन हजार कोटी रुपये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जिल्हा प्रशासनाकडून मागितले जाणार आहेत. याबाबत भूसंपादन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्य रस्ते विकास महामंडळाकडे तोंडी पैशांची मागणी करण्यात आली आहे.
तसेच येत्या काही दिवसात याबाबतचा लेखी प्रस्ताव देखील महामंडळाकडे सादर केला जाणार आहे. यामुळे आता पश्चिम भागातील रिंग रोडच्या भूसंपादनाला गती मिळणार आणि भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण होणार असे सांगितले जात आहे.