Pune To Goa Flight : गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते, रेल्वे सोबतच विमान वाहतूक मजबूत व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न झाले आहेत. विमान वाहतूक मजबूत व्हावी या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी नवीन विमानतळाचे काम पूर्ण केले जात आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी श्रीक्षेत्र अयोध्या नगरीला नवीन विमानतळाची भेट मिळाली. 30 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र आयोध्या येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. याशिवाय पुण्यातील नवीन टर्मिनल देखील पूर्णपणे बांधून तयार आहे.
येत्या काही दिवसात या नव्या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिली आहे. अशातच आता पुणेकरांना आणखी एक मोठी भेट मिळाली आहे.
ती म्हणजे पुणे ते गोवा दरम्यान नवीन विमान सेवा सुरू झाली आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक शहर आहे. या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या शहरातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते.
यामुळे या पुण्यनगरीला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळाली आहे. दरम्यान या सांस्कृतिक राजधानीहुन प्रमुख पर्यटन स्थळ गोव्याला जाणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. नवीन वर्ष सेलिब्रेट करणे असो किंवा नाताळ असो पुण्यातून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या वाढत असते.
या मार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. दरम्यान पुणे ते गोवा हा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण की, अकासा एअरलाइन्स या कंपनीने पुण्याहून गोव्याला नवीन विमानसेवा सुरू केली आहे.
या विमानसेवेमुळे आता पुण्याहून गोव्याचा प्रवास फक्त आणि फक्त एका तासात पूर्ण होणार आहे. कंपनीकडून प्राप्त माहितीनुसार अकासा एअरलाइन्सचे विमान दुपारी तीन वाजून 45 मिनिटांनी गोव्यातून निघेल आणि चार वाजून 45 मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे.
तसेच पुणे विमानतळावरून हे विमान पाच वाजून 35 मिनिटांनी निघणार आहे आणि गोव्याला सहा वाजून 35 मिनिटांनी लँड होणार आहे. या विमान सेवेमुळे गोव्यातून पुण्यात आणि पुण्यातून गोव्यात जाणे सोपे होणार आहे.
ही विमानसेवा पर्यटनासाठी खूपच फायदेशीर ठरणार असून यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होईल अशी आशा आहे. खरंतर फक्त गोवाच नाहीतर आपली पुण्यनगरी पुणे देखील पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुण्यातही पाहण्यासारख्या अनेक जागा आहेत. अनेकजण पुणे एक्सप्लोर करण्यासाठी येत असतात.
यामध्ये गोव्यातून येणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. जी लोक गोवा फिरण्यासाठी येतात त्यातील अनेक लोक पुण्याला फिरण्यासाठी निघतात. यामुळे या विमानसेवेने महाराष्ट्र आणि गोव्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार अशी आशा आहे.