बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखांना बँका राहणार बंद, फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking Holiday : येत्या पंधरा दिवसात जानेवारी महिना समाप्त होणार आहे आणि नवीन वर्षातील दुसऱ्या महिन्याची म्हणजेच फेब्रुवारीची सुरुवात होणार आहे. यंदाचा फेब्रुवारी हा महिना विशेष खास राहणार आहे.

यंदा लीप इयर असल्याने फेब्रुवारीचा महिना 28 दिवसाऐवजी 29 दिवसांचा राहणार आहे. दरम्यान देशातील बँक खातेधारकांसाठी फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात बँका तब्बल 14 दिवस बंद राहणार आहे. यामुळे जर तुम्हीही फेब्रुवारी महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे करण्याच्या तयारीत असाल तर आधी तुम्हाला सुट्ट्यांची यादी पहावी लागणार आहे.

आरबीआयने नुकतीच फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये देशातील बँका 14 दिवस बंद राहणार आहेत.

मात्र सर्वच राज्यांमध्ये 14 दिवसांसाठी बँका बंद राहतील असे नाही तर राज्यातील स्थानिक सणांनुसार राज्यनिहाय बँकांची सुट्टी वेगवेगळी राहणार आहे. दरम्यान आता आपण फेब्रुवारी महिन्यात कोणत्या 14 तारखांना बँका बंद राहतील हे थोडक्यात पाहणार आहोत.

फेब्रुवारीत किती दिवस बँका बंद राहणार

4 फेब्रुवारी : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे. ही फेब्रुवारी महिन्यातील पहिली सुट्टी राहील.

10 फेब्रुवारी : या दिवशी दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

11 फेब्रुवारी : रविवार निमित्ताने देशातील सर्व बँका बंद राहणार आहे.

10 ते 12 फेब्रुवारी : लोसरनिमित्त सिक्किम राज्यातील बँकांना या दोन दिवस सुट्ट्या राहणार आहेत. 

14 फेब्रुवारी : वसंत पंचमी निमित्त हरीयाणा, ओदिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.

15 फेब्रुवारी : या दिवशी लुई-नगाई-नी निमित्त मणिपूरमध्ये बँकांना सुट्टी राहणार असे आरबीआय ने सांगितले आहे.

18 फेब्रुवारी : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

19 फेब्रुवारी : छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँकांना या दिवशी सुट्टी जाहीर राहणार आहे. शिवप्रभुंना विनम्र अभिवादन देण्यासाठी या दिवशी महाराष्ट्र राज्यातील बँकांचे कामकाज बंद ठेवले जाणार आहे.

20 फेब्रुवारी : या दिवशी मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश येथे राज्य दिनानिमित्त बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

24 फेब्रुवारी : चौथा शनिवार असल्याने या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

25 फेब्रुवारी : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील. ही फेब्रुवारी महिन्यातील शेवटची सुट्टी राहणार आहे.

Leave a Comment