बँक ऑफ बडोदा, एचडीएफसीसह ‘या’ बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका ! ‘या’ निर्णयामुळे होम लोनचा हप्ता वाढणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BOB And HDFC Home Loan Interest Rate : होम लोन घेतलेल्या आणि घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील काही प्रमुख बँकांनी होम लोन वरील व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे. खरंतर एकीकडे नव्या वर्षा देशातील अनेक बँकांनी एफडी वरील व्याजदरात वाढ केली आहे.

FD वरील व्याजदरात वाढ होण्याचे कारण म्हणजे आरबीआयने रेपो रेटमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात मोठी वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून मुदत ठेवीचे व्याजदर वाढले आहे.त्यामुळे एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना यंदा चांगला परतावा मिळत आहे यात शंकाच नाही. मात्र दुसरीकडे बँकांनी एमसीएलआरच्या रेटमध्ये देखील वाढ केली आहे.

याचा परिणाम म्हणून बँकेकडून दिले जाणारे होम लोन, पर्सनल लोन असे वेगवेगळे कर्ज महाग होणार आहेत.परिणामी गृहकर्ज घेतलेल्या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. या नव्या वर्षात खाजगी क्षेत्रातील तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी देखील एमसीएलआर वाढवले आहे.

यामध्ये बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक या बँकांचा देखील समावेश आहे. याव्यतिरिक्त इतरही अन्य बँकांनी एम सी एल आर वाढवले आहेत. दरम्यान आज आपण या तीन बँकांनी MCLR किती वाढवला आहे? याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

पंजाब नॅशनल बँक : बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२४ पासून MCLR मध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ५ बेस पॉइंट्सने झाली आहे. आता बँकेचे MCLR ८.२ टक्क्यांवरून ८.२५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आधी एका महिन्यासाठीचा MCLR ८.२५ टक्के केवढा होता मात्र यात पाच बेस्ट पॉईंटची वाढ झाली असून हा रेट ८.३० टक्के झाला आहे.

तसेच तीन महिन्यांचा दर ८.३५ टक्क्यांवरून ८.४० टक्के झाला आहे. शिवाय सहा महिन्यांचा दर ८.५५ टक्क्यांवरून ८.६० टक्के झाला आहे. एक वर्षाचा दर ८.६५ टक्क्यांवरून पाच बेस पॉईंटने वाढवून ८.७० टक्के करण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदा : या बड्या बँकेने देखील ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. या बँकेने 12 जानेवारीपासून एमसीएलआर रेटमध्ये बदल केले आहेत. बँकेच्या माध्यमातून एका रात्रीचा, हा महिन्यांचा आणि एका वर्षाचा एमसीएलआर रेट वाढवला आहे.

बाकीचे रेट आधी होते तसेच कायम ठेवण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे या संबंधित कालावधीमधील कर्जांवर परिणाम होणार असून यामुळे वैयक्तिक कर्जासहित गृह कर्जाचे देखील व्याजदर वाढणार आहेत. त्यामुळे कर्जाचा हफ्ता वाढेल यात शंकाच नाही.

HDFC बँक : ही खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय रिपब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे तर खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी ही बँक सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

मात्र एचडीएफसी ने देखील या चालू नवीन वर्षात ग्राहकांना मोठा झटका दिला असून एमसीएलआर रेटमध्ये वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून गृहकर्जासहित सर्व प्रकारचे कर्ज महाग होण्याची शक्यता आहे. या बँकेने देखील पाच बेस पॉईंटने एमसीएलआर वाढवले आहेत.

Leave a Comment