SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 9 वर्षाच्या RD स्कीममध्ये 9,999 रुपयांची मासिक गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI RD Scheme  Benefit : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिस अन एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना याशिवाय बँकेची एफडी योजना हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत.

याशिवाय सोने आणि चांदी मध्ये देखील सुरक्षित गुंतवणूक केले जाऊ शकते. सोने आणि चांदीची गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देत आहे. याशिवाय बँकेची आरडी योजना देखील चांगला परतावा देण्यास सक्षम आहे.

आरडी योजनांवर देखील बँकेच्या माध्यमातून आता चांगले व्याजदर दिले जाऊ लागले आहे. दरम्यान आज आपण भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर आरडी केली तर गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याविषयी जाणून घेणार आहोत.

खरे तर एसबीआय ही देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात कर्ज पुरवले जात आहे. वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्जांवर बँकेकडून कमी व्याज आकारण्याचा प्रयत्न होत आहे.

याशिवाय FD योजना आणि आरडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत आज आपण जर या बँकेच्या RD मध्ये मासिक 9,999 रुपयांची गुंतवणूक केली तर नऊ वर्षांनी गुंतवणूकदारांना किती रक्कम मिळणार याविषयी माहिती पाहणार आहोत.

एसबीआय RD साठी देते एवढे व्याज

मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पाच ते दहा वर्षांच्या कालावधी मधल्या आरडीसाठी 6.50% एवढे व्याजदर उपलब्ध करून दिले जात आहे.

विशेष म्हणजे जर ज्येष्ठ नागरिकांनी या स्कीम मध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 0.50 टक्के अधिकचे व्याजदर दिले जाते. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एसबीआय आरडी स्कीमवर सात टक्के व्याजदराने रिटर्न देत आहे.

अशा परिस्थितीत जर सर्वसामान्य ग्राहक 9 वर्षांच्या टाईम फ्रेमसाठी मासिक 9999 रुपयांची आरडी करतील तर मॅच्युरिटीवर 14 लाख 67 हजार 680 रुपये एवढी रक्कम गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

यामध्ये दहा लाख 79 हजार 892 एवढी इन्वेस्टमेंट म्हणून राहणार आहे आणि उर्वरित रक्कम म्हणजेच तीन लाख 87 हजार 788 रुपये एवढे व्याज अर्थातच रिटर्न राहणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना याच योजनेतून मॅच्युरिटीवर 15 लाख 4145 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

यात दहा लाख 79 हजार 892 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट राहणार आहे आणि उर्वरित रक्कम अर्थातच चार लाख 24 हजार 253 रुपये एवढे व्याज किंवा रिटर्न राहणार आहेत. 

Leave a Comment