Pune Traffic News : आज पासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. आज सायंकाळी घटस्थापना होणारा असून घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. हा उत्सव पुढील दहा दिवस अविरतपणे सुरू राहणार आहे. तसेच 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होईल.
यावर्षी पुण्यातही नवरात्र उत्सव सालाबादाप्रमाणे मोठ्या आनंदात साजरा होणार आहे. अशातच मात्र पुणेकरांसाठी एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्यातील वाहतुकी संदर्भात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एक महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे तो रस्ता तब्बल दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
यामुळे नवरात्र उत्सव आणि दिवाळी सणाच्या अगोदरच महापालिकेने घेतलेला हा निर्णय पुणेकरांसाठी त्रासदायक ठरणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडेल आणि वाहतूक कोंडी सारखी परिस्थिती तयार होईल असे मत व्यक्त होत आहे.
कोणता रस्ता राहणार बंद
खरतर पुणे महापालिकेकडून शहरात विविध रस्त्यांची कामे केली जात आहेत. याच कामाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन महिने डेक्कन बस स्थानक ते जिमखानापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे. या मार्गावर पुणे महापालिकेकडून रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
दरम्यान डेक्कन बस स्थानक ते जिमखानापर्यंतचा रस्ता बंद करण्याचा निर्णय झाला असल्याने शहरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना तसे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग कोणते
डेक्कन बस स्थानक ते जिमखानापर्यंतचा रस्ता बंद राहणार असल्याने केळकर रस्त्यावरून जंगली महाराज रस्त्याकडे आणि नारायण पेठ कडे येणारी वाहतूक गाडगीळ अर्थातच झेड ब्रिज पुलावरून जाऊ शकणार आहे.
तसेच भिडे पूल, सुकांता हॉटेल, खाऊ गल्ली मार्गे जंगली महाराज रस्त्याने नागरिकांना इच्छित स्थळी जाता येणार आहे.
केळकर रस्त्याने डेक्कन जिम खाण्याकडे जाणाऱ्या वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.