Pune Vande Bharat Train News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या शहराला शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणूनही ओळख प्राप्त झाली आहे. दरम्यान, पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सांस्कृतिक राजधानी पुण्याला उद्या दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. सध्या स्थितीला महाराष्ट्रातील सात महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
अर्थातच राजधानी मुंबईला पाच वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.पुण्याला मात्र सध्या स्थितीला मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा लाभ मिळत आहे.
अर्थातच अजूनही पुण्यातून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. पण आता पुणेकरांची ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. पुणे शहरातून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
कोणत्या मार्गांवर सुरू होणार वंदे भारत
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 12 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करणार आहेत. यातील दोन गाड्या या पुण्याला मिळणार आहेत.
उद्या पुणे ते बडोदा आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार अशा चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरू होत्या.
परंतु या गाड्यांना मुहूर्त मिळत नव्हता. आता मात्र उद्यापासून या दोन्ही मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. सध्या स्थितीला पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे.
पण, ही एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी तेथे वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. यामुळे पुणे ते सिकंदराबाद हा प्रवास तसेच पुणे ते बडोदा हा प्रवास गतिमान होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेसची संख्या पोहोचणार 51 वर
संपूर्ण भारतीय बनावटीची ही हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली होती. ही गाडी 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. शिवाय या ट्रेनमध्ये अनेक वर्ल्ड क्लास सोयी सुविधा आहेत ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी बनत आहे.
आरामदायी आणि जलद प्रवासामुळे ही ट्रेन कमी दिवसातच लोकप्रिय बनली आहे. आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. उद्या आणखी दहा नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. म्हणजेच आता देशातील 51 मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू होणार आहे.