3 KW चे सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार देणार 78 हजार रुपयांचे अनुदान ! ‘या’ 6 स्टेप्स फॉलो करून आजच अर्ज करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Panel Subsidy : अलीकडे वाढीव वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. उन्हाळ्यात तर वीजबिल अधिकच वाढते. सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला असून या हंगामात देखील वीजबिल सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणार आहे. दरम्यान जर तुम्ही वाढीव वीज बिलामुळे अडचणीत आला असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. कारण की, आता तुम्हाला महिन्याकाठी 300 युनिट पर्यंतची वीज मोफत मिळू शकणार आहे.

यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला केली होती. त्यावेळी पीएम मोदी यांनी या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे संबोधले होते. तसेच याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले होते की देशातील एक कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंतची मोफत वीज मिळणार आहे.

या अंतर्गत छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी दिली जाणार असे देखील त्यांनी सांगितले होते. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची माहिती दिली. या योजनेसाठी 75,000 कोटी रुपयांचा खर्च शासन करणार असे त्यांनी सांगितले. यानंतर मग केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.

यावेळी या योजनेचे नामकरण पीएम सूर्यघर योजना असे करण्यात आले. यासाठी एक नवीन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत आता देशभरातील नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान पुरवले जाणार आहे. या अंतर्गत 78,000 पर्यंतचे अनुदान नागरिकांना मिळू शकणार आहे. एक किलोवॅट पासून ते दहा किलोवॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे.

या अंतर्गत एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी तीस हजार रुपये, 2 किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60,000 रुपये आणि तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमता असलेले आणि दहा किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान पुरवले जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्याची प्रोसेस कशी आहे, या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा लागणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रोसेस

1)या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी तुमच राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल मग तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकून तुम्हाला नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

2)नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉग इन करावे लागेल. मग तुम्हाला रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज करायचा आहे.

3) यासाठी फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळेल. ही मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर प्लांट बसवू शकता. मग सदर विक्रेत्याकडून सोलर प्लांट इंस्टॉलेशन पूर्ण होईल.

4) यानंतर प्लांटचे तपशील तुम्हाला पुन्हा एकदा पोर्टलवर सबमिट करावे लागतील आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.

5) नेट मीटर बसवले जाईल अन DISCOM द्वारे तपासणी होईल. पोर्टलवर एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. हे प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल.

6) मग तुम्हाला पोर्टलवर बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागणार आहे. एवढे केल्यानंतर तुम्हाला सबसिडीची रक्कम ३० दिवसांच्या आत मिळेल. ही रक्कम बँक खात्यात वर्ग होईल.

Leave a Comment