Punjab National Bank : तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना अक्षयतृतीयाच्या आधीच एक मोठी भेट दिली असून एफडी व्याजदरात वाढ केली आहे.
यामुळे जर तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आता जास्तीचा परतावा मिळणार आहे. पीएनबी ही देशातील प्रमुख सरकारी बँक आहे. देशात एकूण 12 सरकारी बँका आहेत. पीएनबी यातीलच एक आहे.
ही बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीची एफडी ऑफर करत आहे. यावर बँकेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.25% आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना चार टक्के ते 7.75 टक्के यादरम्यान व्याज दिले जात आहे.
मात्र जे सुपर सीनियर सिटीजन आहेत अर्थातच ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना पीएनबी बँकेच्या माध्यमातून FD साठी कमाल 8.25 टक्के या दराने व्याज दिले जात आहे. दरम्यान आता आपण पीएनबीने रिवाईज केलेले एफडीचे दर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत PNB चे FD चे नवीन दर
7 दिवस ते 45 दिवस : सामान्य ग्राहकांना 3.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना चार टक्के
46 दिवस ते 179 दिवस: ४.५० टक्के सर्वसामान्यांसाठी; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.०० टक्के
180 दिवस ते 270 दिवस: सर्वसामान्यांसाठी 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के
300 दिवस: सर्वसामान्यांसाठी 7.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५५ टक्के
1 वर्ष: सर्वसामान्यांसाठी 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२५ टक्के
1 वर्ष ते 399 दिवसांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के
400 दिवस : सर्वसामान्यांसाठी 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के
400 दिवसांपेक्षा जास्त ते 2 वर्षे : सर्वसामान्यांसाठी 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त : सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.00 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के.