FD करताय का ? मग पंजाब नॅशनल बँकेच्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवणूक करा, मिळणार जबरदस्त परतावा ! वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab National Bank FD News : प्रत्येकालाच आपल्याकडील पैसा वाढावा, पैसा मोठा व्हावा असे वाटते. यासाठी आपल्यापैकी अनेकांनी विविध ठिकाणी गुंतवणूक देखील केली असेल. यातील अनेकांनी बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक केली असेल.

दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की, आज आपण देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या एका एफडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतात 12 पब्लिक सेक्टर अर्थात सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. यात पंजाब नॅशनल बँकेचा देखील समावेश होतो.

ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. यामुळे आज आपण बँकेच्या एका सर्वात जास्त व्याजदर असणाऱ्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

कोणत्या FD योजनेतून मिळणार अधिकचा परतावा

पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची एक खास एफडी योजना ऑफर केली जात आहे. यावर बँकेकडून चांगले व्याजही मिळत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पीएनबी बँक चारशे दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 7.25 टक्के एवढे व्याज देत आहे. विशेष बाब अशी की, पंजाब नॅशनल बँकेची ही सर्वात जास्त व्याज देणारी एफडी योजना म्हणून ओळखली जाते.

वरिष्ठ नागरिकांना मिळणार जास्तीचे व्याजदर

पंजाब नॅशनल बँकेच्या या चारशे दिवसाच्या एफडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आणि सुपर सिनियर सिटीजन यांना अधिकचे व्याजदर दिले जात आहे.

या योजनेतून वरिष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि सुपर सीनियर सिटीजन यांना 8.05% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. अर्थातच यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सुपर सीनियर सिटीजन यांना अधिकचा फायदा मिळू शकणार आहे.

2.50 लाखाची गुंतवणूक केली तर किती व्याज मिळणार

या एफडी योजनेमध्ये जर सामान्य ग्राहकांनी दोन लाख 50 हजार रुपयांची रक्कम गुंतवली तर त्यांना मॅच्युरिटीवर अर्थात चारशे दिवसांनी दोन लाख 69 हजार 930 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. म्हणजे मॅच्युरिटीवर 19 हजार 930 रुपयांचा परतावा सदर गुंतवणूकदाराला मिळणार आहे.

Leave a Comment