Punjab National Bank RD Scheme : अलीकडे सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व मिळू लागले आहे. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये, आपल्या पैशांचे नुकसान होऊ नये यासाठी आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीलाचं प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस अन एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी अन आरडी योजना, केंद्र शासनाकडून सुरू झालेल्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. दरम्यान, आज आपण बँकेत आरडी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण जर पंजाब नॅशनल बँकेत पाच वर्षांसाठी प्रति महिना 3,000 रुपयांप्रमाणे आरडी केली तर गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पब्लिक सेक्टर मधील पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक लोकप्रिय बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना चालवत आहे. ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, गोल्ड लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
एवढेच नाही तर एफडी आणि आरडी योजनांवर देखील अधिकचे व्याज दिले जात आहे. पंजाब नॅशनल बँकेत अर्थातच पीएनबी मध्ये आरडीसाठी 6.5% व्याजदर आहे. अशा परिस्थितीत जर ग्राहकांनी या बँकेत पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रति महिना 3,000 रुपये आरडी केली तर सदर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीच्या वेळी 2 लाख 12 हजार रुपये मिळणार आहेत.
यामध्ये 1 लाख 80 हजार रुपयाची रक्कम ही गुंतवणूकदाराची गुंतवणूक राहणार आहे.तसेच उर्वरित रक्कम म्हणजेच 32 हजार रुपये सदर गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न म्हणून मिळणार आहेत.
येथे आम्ही जे कॅल्क्युलेशन दिले आहे ते कॅल्क्युलेशन सर्वसामान्य ग्राहकांसाठी आहे. कारण की बँकेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना आरडीसाठी देखील अधिकचे व्याजदर दिले जात आहे.
ही बँक एफडी साठी देखील वरिष्ठ नागरिकांना अधिकचे व्याज देते. तसेच आरडीसाठी देखील बँकेकडून वरिष्ठ नागरिकांना अधिकचे व्याज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे या बँकेत वरिष्ठ नागरिकांनी आरडी केली तर त्यांना अधिकचा परतावा मिळू शकणार आहे.