Ration Card News : केंद्र शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन निर्णय घेतले जातात. या नवनवीन निर्णयाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र शासन करते. यामध्ये रेशन योजनेचा देखील समावेश आहे.
देशातील नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशनिंगची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार रेशनकार्ड धारक लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे.
विशेष बाब म्हणजे कोरोना काळापासून शासनाने गरीब लोकांना मोफत धान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोफत धान्याची योजना अजूनही सुरूच आहे. ही योजना सुरू करण्यामागे गरीब लोकांचे हित जोपासने हा शासनाचा हेतू होता.
मात्र, रेशन योजनेचा अनेक अपात्र लोकांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे जे लोक रेशन घेण्यासाठी अपात्र आहेत. मात्र तरीही रेशन घेत आहेत अशा लोकांवर आता कडक कारवाई केली जात आहे.
दरम्यान आज आपण कोणते रेशन कार्ड धारक रेशन घेण्यासाठी अपात्र आहेत याबाबत जाणून घेणार आहोत. तसेच या अपात्र लोकांना काय करावे लागणार आहे? याविषयी देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन घेण्यासाठी कोण आहेत अपात्र?
100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट/दुकान, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, स्वत:च्या उत्पन्नातून खरेदी केलेला शस्त्र परवाना, तसेच ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न गावात 2 लाख किंवा शहरात 3 लाख आहे असे लोक रेशन घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत.
अपात्र लोकांवर काय कारवाई होणार?
अशा अपात्र लोकांना आपले रेशन कार्ड शासनाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले जात आहे. हे लोक त्यांचे रेशनकार्ड तहसीलमध्ये सादर करू शकतात. पण जर अशा लोकांनी आपले रेशन कार्ड सरकार दरबारी जमा केले नाही तर त्यांच्यावर शासन कारवाई करणार आहे.
अशा अपात्र लोकांनी आपली शिधापत्रिका सरकारकडे सादर न केल्यास पडताळणीनंतर अशा लोकांची शिधापत्रिका रद्द केली जाईल. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई देखील होणार आहे. तसेच अशा अपात्र कुटुंबांनी आतापर्यंत जे काही रेशन घेतले आहे, तेही त्यांच्याकडून वसूल केले जाईल.
म्हणून जे अपात्र लोक असतील त्यांनी खाली दिलेला फॉर्म भरून जवळच्या स्वस्त रेशन दुकानात किंवा तहसील कार्यालयात जाऊन सबमिट करावा असे आवाहन केले जात आहे. हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर अशा अपात्र लोकांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1N_kTRZmXDVVEQ49oELgE45P4PHxNHI-A/view