राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार एकाच वेळी 3 गुड न्युज ! महागाई भत्ता वाढ, जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासन लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

दरम्यान, आता केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार असून आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार असे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 60 वर्षे केले जाणार आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे असून यामध्ये दोन वर्षे वाढ करणे शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजनेचे लाभ अनुज्ञय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकतर राष्ट्रीय पेन्शन योजनेंमध्ये अर्थातच नवीन पेन्शन योजनेत बदल केला जाईल अथवा दुसरीच पेन्शन प्रणाली लागू होईल असे बोलले जात आहे.

विशेष बाब म्हणजे याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सोनिक यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्य सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. यासाठी संबंधितांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोबतच त्यांनी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबतच्या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याची ग्वाही देखील दिली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी गठीत झालेल्या समितीच्या अहवालानंतर पेन्शन बाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे देखील यावेळी नमूद केले आहे.

Leave a Comment